Monday, August 4, 2025
Homeराजकीय घडामोडीशिंदेंच्या शिवसेनेतील माजी नगरसेवक रंगेहात पकडला, अटक होताच आजारी; न्यायालयाकडून 1 दिवस...

शिंदेंच्या शिवसेनेतील माजी नगरसेवक रंगेहात पकडला, अटक होताच आजारी; न्यायालयाकडून 1 दिवस पोलीस कोठडी

शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकास 5 लाखाच्या खंडणीप्रकरणी न्यायालयाने एक दिवसाची पोलीस (police) कोठडी सुनावली आहे. बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराकडे राय यांनी 35 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. याप्रकरणी, 5 लाख रुपये लाच (Bribe) स्वीकारताना आरोपी राय यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली होती. विशेष म्हणजे यापूर्वीच आरोपीने संबंधित कंत्राटादारकडून 8 लाख रुपयांची लाच स्वीकारली देखील असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी, आरोपीला न्यायालयात (Court) हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

अंधेरीतील एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी माजी नगरसेवक कमलेश राय याला 5 लाख रुपयांची खंडणी घेताना रंगेहात पकडले होते. मात्र, अटक झाल्यानंतर कमलेश राय यांची तब्येत बिघडल्यामुळे महापालिकेच्या कूपर रुग्णालयात दोन दिवस उपचार करण्यात आले. त्यानंतर, आज एमआयडीसी पोलिसांनी अटक आरोपी कमलेश राय याला अंधेरी न्यायालयात हजर केले. आरोपी राय यांच्याकडून 8 लाख रुपये रिकव्हर करण्यासाठी अंधेरी न्यायालयाकडे पोलिसांनी 5 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र, न्यायालयाने आरोपी कमलेश राय याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. सध्या आरोपी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात असून एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत आहे.

 

पोलिसांकडे प्राप्त तक्रारीनुसार राय यांनी तक्रारदार कंत्राटदारास धमकी दिली होती. तुझ्या साईटच्या बांधकामाच्या परवागनग्या तुझ्याकडे नाहीत. मी तुला काम करू देत नसतो, असे म्हणत 35 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर, कंत्राटदाराने अंधेरीतील एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार, सापळा रचून माजी नगरसेवकाला रंगेहात अटक करण्यात आली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -