भारत आणि श्रीलंका यांच्यात वनडे मालिका होत आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. पण टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनबाबत कर्णधार रोहित शर्मासमोर पेच आहे. केएल राहुल की ऋषभ पंत यापैकी कोणाची निवड करणार? यावर रोहित शर्माने आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.
टी20 वर्ल्डकप विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहे. त्याच्या नेतृत्वात चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचा प्रवास सुरु होणार आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार रोहित शर्मा ही जोडी पहिल्यांदा वनडे मालिकेत दिसणार आहे. या जोडीकडून पुढच्या आयसीसी स्पर्धेसाठी खूप अपेक्षा आहेत. यात चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 या स्पर्धांचा समावेश आहे. दरम्यान कर्णधार रोहित शर्माने रेवस्पोर्ट्सशी बोलताना आपलं मन मोकळं केलं. “गौतम गंभीर खूप सारं क्रिकेट खेळल आहे. भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी येण्यापूर्वी त्याने आयपीएल फ्रेंचायझीसोबत काम केलं आहे. आम्ही काही काळ एकत्र क्रिकेटही खेळलो आहोत. प्रत्येक नवीन कोचिंग स्टाफ काहीतरी वेगळेपणा आणत असतो.”, असं कर्णधार रोहित शर्मा याने सांगितलं.
प्लेइंग इलेव्हनमध्ये ऋषभ पंत की केएल राहुलला संधी मिळणार? या प्रश्नावर रोहित शर्माने आपलं स्पष्ट मत ठेवलं. ‘केएल राहुल आणि ऋषभ पंत यांच्यापैकी एकाची निवड करणं खरंच खूप कठीण आहे. दोघंही मॅच विनर त्यांची शैली वेगळी आहे. हा एक चांगली समस्या आहे. मला या पद्धतीची समस्या हवी आहे.’, असं रोहित शर्मा म्हणाला. भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला वनडे सामना 2 ऑगस्ट, दुसरा वनडे सामना 4 ऑगस्ट आणि तिसरा वनडे सामना 7 ऑगस्टला होणार आहे.
भारत एकदिवसीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (विकेट कीपर), ऋषभ पंत (विकेट कीपर), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, यल्दीम, सर मोहम्मद वाशी, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.
एकदिवसीय मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ: चारित असलंका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, सदीरा समरविक्रमा, कामिंदू मेंडिस, जेनिथ लियानागे, निशान मदुष्का, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेललागे, चमिका करुणारत्ने, महीश थीक्षाना, अकिला धनंजया, इशान मलिंगा, मोहम्मद शिराज, असिथा फर्नांडो.