Monday, May 27, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापुरात खंडणी उकळणार्‍या महिलेकडून मुंबईतही ‘हनी ट्रॅप’

कोल्हापुरात खंडणी उकळणार्‍या महिलेकडून मुंबईतही ‘हनी ट्रॅप’

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूरच्या एका साखर व्यावसायिकाला ‘हनी ट्रप’द्वारे (Honey Trap) ब्लॅकमेल करून सव्वातीन कोटी रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी अटक केलेल्या सपना वजीर ऊर्फ लुबना या महिलेविरुद्ध वांद्रे पोलिस ठाण्यात दुसरा फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वांद्रे येथील एका हिरे व्यावसायिकाची फसवणूक केल्याचा सपनावर आरोप असून, गुन्हे शाखेकडून याचा तपास सुरू आहे.

सपना ही एका बॉलीवूड अभिनेत्याची पत्नी असून, तिने आतापर्यंत अनेकांची फसवणूक केल्याचे बोलले जाते. गेल्या महिन्यात सपनासह तिचे दोन सहकारी अनिल ऊर्फ आकाश बन्सीलाल चौधरी आणि मनीष नरेंद्र सोधी या तिघांना गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली होती. याच गुन्ह्यात ती सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

या टोळीने कोल्हापूरच्या एका साखर व्यावसायिकाला हनी ट्रॅपमध्ये (Honey Trap) अडकावून त्याच्याकडून या टोळीने सव्वातीन कोटी रुपये घेतले होते.सपनाच्या अटकेनंतर वांद्रे येथील एका सोन्याच्या व्यापार्‍याने तिच्याविरुद्ध वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारदाराचे वांद्रे परिसरात पॉश ज्वेलरी दुकान आहे. याच दुकानात सपना ही एका मर्सिडीज कारमधून आली होती. तिने व्यापार्‍याला विविध आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याच्याकडील 28 लाख रुपयांचा हिर्‍याचा हार घेऊन ती पळून गेली होती. हा प्रकार नंतर व्यापार्‍याच्या निदर्शनास येताच त्यांनी वांद्रे पोलिसांत तक्रार केली होती. त्यांची फसवणुक करणारी महिला सपना असल्याचे नंतर उघडकीस आले होते. दरम्यान, सपनाच्या चौकशीतून इतर काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -