Thursday, February 6, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी महापालिकेतर्फे भटक्या कुत्र्यांची निर्बीजीकरण मोहीम सुरू

इचलकरंजी महापालिकेतर्फे भटक्या कुत्र्यांची निर्बीजीकरण मोहीम सुरू

ताजी बातमी /ऑनलाईन टीम

 

इचलकरंजी शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास आलेने तसेच या संदर्भात विविध प्रसिद्धी माध्यमांद्वारे तसेच शहरातील विविध सामाजिक स्वयंसेवी संस्थांचे आणि सार्वजनिक मंडळांचे प्रतिनिधी यांचेकडून समक्ष भेटून निवेदनाद्वारे शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणेची मागणी

महानगरपालिका प्रशासनाकडे करणेत येत होत्या.

 

या अनुषंगाने आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी तातडीने उपायुक्त प्रसाद काटकर, उपायुक्त स्मृती पाटील, उपायुक्त सोमनाथ आढाव आणि इचलकरंजी शहरातील पशुवैद्यकीय केंद्राचे पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. चिकबिरे यांच्या सोबत भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर उपाय योजना करणेसाठी तातडीने बैठक घेऊन शहरातील भटक्या कुत्र्यांची निर्बीजीकरण मोहीम तात्काळ सुरू करणेचे आदेश आरोग्य विभागास दिले होते.

 

या आदेशानुसार शनिवार दि.३ ऑगस्ट पासून जॅनिस स्मिथ ॲनिमल वेल्फेअर ट्रस्ट, पाचगणी या संस्थेच्या माध्यमातून शहरातील भटक्या कुत्र्यांची निर्बीजीकरण मोहीम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आलेली असुन या संस्थेकडून शहरातील भटकी कुत्री पकडणेचे काम तातडीने सुरू करणेत आलेले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -