Monday, August 4, 2025
Homeब्रेकिंगअवघ्या काही मिनिटात करोडोला धुपले, अमेरिकेत मंदीची चाहूल लागताच शेअर मार्केट धडाम…

अवघ्या काही मिनिटात करोडोला धुपले, अमेरिकेत मंदीची चाहूल लागताच शेअर मार्केट धडाम…

गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहे. त्यातच आता शेअर मार्केट गुंतवणूकदारांना आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मोठा धक्का बसला आहे. शेअर मार्केटमध्ये सेन्सेक्सची तब्बल 2400 अंकांहून मोठी घसरण झाली आहे. तर दुसरीकडे निफ्टीही 500 अंकांनी घसरला आहे. यामुळे सोमवारी शेअर बाजार सुरु होताच गुंतवणूकदारांना तब्बल 10 लाख कोटींचा फटका बसला आहे.

 

सध्या अमेरिकेत मंदी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचा परिणाम मुंबई शेअर बाजारावर झाल्याचे बोललं जात आहे. आज सकाळी व्यवहार सुरु होताच सेन्सेक्सची सुरुवातच निराशाजनक झाली. BSE सेन्सेक्स 1,310.47 अंकांनी खाली घसरला. त्यामुळे सेन्सेक्स हा 79,671.48 अंकांवर आला. तर निफ्टी 404.40 अंकांसह घसरुन 24,313.30 वर आली. यावेळी स्मॉल व मिडकॅप शेअर्सच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.

 

10 लाख 24 हजार कोटी रुपयांचे नुकसान

मुंबई शेअर बाजारात Sensex आणि Nifty50 च्या घसरणीमुळे गुंतवणूकदार अस्वस्थ झाले आहेत. शुक्रवारी शेअर मार्केट बंद होताना त्याचे मूल्य 457.16 लाख कोटी रुपये इतके होते. तर सकाळी शेअर मार्केट सुरु होताच सेन्सेक्समध्ये घसरण झाली आणि ते थेट 446.92 लाख कोटी रुपयांवर घसरले. यानुसार गुंतवणूकदारांचे 10 लाख 24 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

 

टाटा मोटर्स, टेक महिंद्रा, टाटा स्टील, मदर सन शेअर, एलआयसी हाऊसिंग फायनान्स, भारत फॉर्ग शेअर, किर्लोस्कर ब्रदर्स यांसारख्या अनेक कंपन्यांचे शेअर्सच्या किंमती कमी झाल्या आहेत.

 

शेअर मार्केट पडण्याचे कारण काय?

 

भारतीय शेअर बाजाराच्या पडझडीला अनेक घटना कारणीभूत ठरल्या आहेत. यात सर्वांत महत्त्वाची घटना म्हणजे इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावाची स्थिती असल्याचे बोललं जात आहे. तर दुसरीकडे अमेरिकेत बेरोजगारी वाढली आहे. तसेच अमेरिकेत महागाईदेखील वाढल्याचे दिसत आहे. अमेरिकन शेअर बाजारात शुक्रवार मोठी पडझड झाली होती. त्यानंतर आता भारतीय शेअर बाजारावर याचा परिणाम झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -