हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आज राज्याच्या काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा (Heavy Rain) इशारा देण्यात आला आहे. जाणून घेऊयात आजचा हवामानाचा अंदाज.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील काही भागातच पाऊस पडत आहे. बहुतांश जिल्ह्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहिले आहेत. तर धरणांच्या पाणीसाठ्यात (Dam Water) देखील वाढ झालीय. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आज राज्याच्या काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा (Heavy Rain) इशारा देण्यात आला आहे. जाणून घेऊयात आजचा हवामानाचा अंदाज.
या जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील सहा जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये कोकणातील रायगड, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे तर विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. या सहा जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं या जिल्ह्यातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
तळकोकणातील काही भागात पावसाचा जोर कायम
तळकोकणातील काही भागात पावसाचा जोर कायम असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे.
कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग, वैभववाडीत पावसाचा जोर कायम आहे. समुद्र खवळलेल्या स्थितीत असल्याने मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असे आवाहन मच्छ विभागानं केलं आहे.