इंग्लंडने तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशीच्या पहिल्याच सत्रात भारताचा धुव्वा उडवत मालिकेत बरोबरी केली आहे. भारतीय संघाचा तिसऱ्या दिवसातील कामगिरीतील कामगिरी वगळल्यास भारताला पूर्णत: बॅकफूट ठेवत यजमानांनी दमदार कामगिरी केली. इंग्लंडने ९९.३ षटकात भारताला २७८ धावांमध्ये गुंडाळले.
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज रॉबिन्सनने तब्बल ५ जणांना तंबूत धाडत भारताला गारद केले. तिसऱ्या दिवशीच्या पहिल्याच सत्रात पुजारा आणि कोहली बाद झाल्याने भारताचा पराभव निश्चित झाला.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताची खराब सुरुवात झाली. शतकाच्या प्रतिक्षेत असलेला पुजारा आज एकही धावाची भर न घालता ९१ धावांवर बाद झाला. त्याला रॉबिन्सनने बाद केले. त्यानंतर विराटने आपले अर्धशतक पूर्ण केले मात्र त्यानंतर रॉबिन्सननेच विराटला (५५ ) स्लिपमध्ये बाद केले. पाठोपाठ अँडरसनने अजिंक्य रहाणेला ( १० ) पॅव्हेलियनचा रस्ता दाखवत भारताची अवस्था ५ बाद २३९ अशी केली.
त्यानंतर आलेल्या पंतलाही रॉबिन्सननेच परतीचा रस्ता दाखवला. त्यामुळे भारताला सहावा झटकाही २३९ धावांवरच बसला. शमी आणि इशांत शर्माही लागोपाठ बाद झाले. त्यामुळे पहिल्या सत्रातच भारताने तब्बल सहा गडी गमावल्याने भारताचा पराभव जवळपास निश्चित झाला. त्यानंतर भारताचे शेपूट इंग्लंडने झटपट कापून काढले व विजय लांबणार नाही याची काळजी घेतली. जडेजाने केलेल्या ३० धावांच्या खेळीमुळे भारताचा पराभव काहीसा लांबला.
हिल्या सत्रात रॉबिन्सनने उडवली दाणादाण
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी ( ENGvsIND 3rd test D4 ) भारत आपल्या २ बाद २१५ धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली. काल दिवस अखेर चेतेश्वर पुजारा ९१ तर विराट कोहली ४५ धावा करुन नाबाद होते.
आज पहिल्या सत्रात चेतेश्वर पुजाराच्या आक्रमक शतकाची प्रतिक्षा होती. मात्र चौथ्या दिवसाची सावध सुरुवात करणारा पुजारा कालच्या धावसंख्येत एका धावाचीही भर न घालता माघारी गेला. रॉबिन्सनचा एका आत येणाऱ्या चेंडूचा त्याला अंदाज आला नाही. तो बॉल सोडण्याच्या नादात पायचीत झाला. आता भारताच्या सर्व आशा या कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे याच्यावर आहेत.
पुजारा बाद झाल्यानंतर चाचपडत खेळणाऱ्या कर्णधार कोहलीने आपले अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकानंतर विराट मोठी खेळी करेल असे वाटत होते. मात्र पुन्हा इंग्लंडने त्याला ऑफ स्टम्पच्या बाहेर चेंडू टाकून स्लिपमध्ये झेल देण्यास भाग पाडले. पुन्हा एकदा विराटने शतकाची अपेक्षा फोल ठरवली. विराट पाठोपाठ रहाणेही १० धावांची भर घालून माघारी फिरला.
भारताची सुरु झालेली ही गळती काही केल्या थांबली नाही. भेदक मारा करणाऱ्या रॉबिन्सनने पंतचीही ( १ ) शिकार करत भारताला मोठ्या पराभवाच्या छायेत ढकलले.
तत्पूर्वी, तिसऱ्या कसोटीत भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात सर्वबाद ७८ धावा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तारादाखल खेळत इंग्लंडने सर्वबाद ४३२ धावा केल्या. इंग्लंडने पहिल्या डावात ३५४ धावांची आघाडी घेतली होती.