Saturday, July 27, 2024
Homeअध्यात्म'हे' शिवलिंग दरवर्षी बदलते जागा: कुठे आहे, कसे जाता येईल येथे ?

‘हे’ शिवलिंग दरवर्षी बदलते जागा: कुठे आहे, कसे जाता येईल येथे ?

मित्रांनो  महाशिवरात्री दिवशी भगवान शंकरांची भाविक मनोभावे पूजा करतात.   एका अशा मंदिराची कथा जाणून घेणार आहोत, जी तुम्हाला थक्क करेल. भगवान शंकरांच्या या मंदिरातील अशा गोष्टी समोर आल्या आहेत ज्यावर कुणाचाच कधीच विश्वास बसणार नाही.

मित्रांनो, आपल्या भारत देशातील उत्तर प्रदेशातील मयन ऋषी यांच्या मैनपुरीतील एका गावात छोटंस प्राचीन वाणेश्वर मंदिर आहे. या मंदिराबाबत गावकऱ्यांनी एक अतिशय थक्क करणारी गोष्ट सांगितली आहे. येथील भगवान शंकराच्या मंदिरातील शिवलिंग दरवर्षी सरकतं.

मित्रांनो शास्त्रानुसार, आठवड्यातील प्रत्येक दिवस हा देवांना समर्पित केला आहे. महादेवाची पूजा सोमवारी आवर्जून केली जाते. सोमवारी महादेव यांचे भाविक मनोभावे पूजा करतात. सोमवारी शिव भगवानला प्रसन्न करण्याकरता मनोभावे व्रत केले जाते. 

मित्रांनो आपण या लेखामध्ये माहिती घेतोय, मैनपुरी शहरातील वाणेश्वर मंदिराबद्दल. हे मंदिर जुन्या मैनपुरीतील सटे गावातील गोष्ट आहे. हे मंदिर अतिशय लहान असलं तरीही खूप जूनं आहे. या मंदिरातील किस्से देखील अतिशय रंजक आहेत. नगरिया गावात हे मंदिर असल्यामुळे याला नगरिया मंदिर असं संबोधलं जातं. श्रावण महिन्यातील सोमवारी आणि महाशिवरात्री रोजी येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. लांबून लाखो भक्त दर्शनासाठी येतात. मनोभावे पूजा करतात.

मित्रांनो या गावातील स्थानिक नागरिकांचा असा दावा आहे की, दरवर्षी या मंदिरातील शिवलिंग सरकतं. दरवर्षी मंदिरातील शिवलिंग आपली जागा बदलत असतं. तुम्ही देखील या मंदिरात प्रवेश केलात तर हे मंदिर इतर महादेव मंदिरापेक्षा वेगळं असल्याचं तुम्हाला जाणवेल. 

मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलेल्या शिव मंदिरात घंटेच्या खाली शिवलिंग असतं. मात्र वाणेश्वर मंदिरात घंट्याच्या अगदी दोन फूट लांब शिवलिंग आहे. महत्वाची बाब म्हणजे मंदिराच्या दरवाज्याजवळच आहे शिवलिंग. मंदिरात प्रवेश केल्यावरच शिवलिंगाचं दर्शन होतं. महत्वाचं म्हणजे हे शिवलिंग सामान्य नाही. या शिवलिंगाच्या मधोमध मोठी फट दिसते. पाहिल्याच क्षणी असं जाणवेल की, या शिवलिंगावर कुणीतरी मोठ्या प्रमाणात प्रहार केले आहेत. 

आख्यायिका :
मित्रांनो, मंदिरातील शिवलिंग सरकण्यामागे गावकऱ्यांची आख्यायिका आहे की, जवळपास पन्नास ते साठ वर्षांपूर्वी गावात दुष्काळ पडलं होतं. गावकऱ्यांनी पाऊस पडावा म्हणून शिवलिंगाची मनोभावे पूजा केली. मात्र पाऊस काही पडला नाही. यानंतर रागाने मंदिरात पुजारी भोगडानंद यांनी शिवलिंगावर कुऱ्हाडीने वार केले. आज जी शिवलिंगावर मोठी फट आहे ती याच गोष्टीची असल्याचं गावकरी म्हणतात. गावकऱ्यांचं असं देखील म्हणण आहे की,’ज्या दिवसापासून ही घटना घडली तेव्हापासून शिवलिंग आपल्या जागेवरून सरकलं आहे. 

40 दिवसात इच्छा पूर्ण :
मित्रांनो, मंदिरांबाबत असं ही म्हटलं जातं की, या मंदिरात भगवान शिवजवळ कोणतेही नवस केलं तर ते अगदी 40 दिवसांत पूर्ण होतं. 40 दिवस दररोज न चुकता शिवलिंगावर पाणी चढवलं तर त्याचा फायदा होतो. मात्र 40 दिवस महादेव आपल्या भक्ताची कडक परीक्षा घेत असतात. भक्ताला या दिवसांत अनेक संकटांना सामोरं जावं लागलं. मात्र या परीक्षेला तोंड देत जर भक्ताने महादेवाच्या शिवलिंगावर अभिषेक केला. तर त्याचा फायदा नक्की होतो. 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -