Monday, December 23, 2024
Homeइचलकरंजीआमदार प्रकाश आवाडे यांची वचनपूर्ती मंत्रीमंडळ बैठकीत वीज सवलतीसाठी नोंदणीची अट...

आमदार प्रकाश आवाडे यांची वचनपूर्ती मंत्रीमंडळ बैठकीत वीज सवलतीसाठी नोंदणीची अट रद्द

इचलकरंजी

27 अश्‍वशक्तीवरील यंत्रमागासाठी 75 पैशांची अतिरिक्त आणि 27 अश्‍वशक्तीखालील यंत्रमागासाठी प्रतियुनिट 1 रुपयांच्या वीज सवलतीमध्ये अडचण ठरत असलेली ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीची तांत्रिक अट रद्द करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या प्रश्‍नी वस्त्रोद्योगातील जाणकार आमदार प्रकाश आवाडे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळून राज्यभरातील यंत्रमागधारकांना सवलतीचा लाभ मिळणार आहे.

मागील अनेक वर्षांपासून वस्त्रोद्योग विशेषत: यंत्रमाग व्यवसाय नानाविध अडचणीतून मार्गक्रमण करीत होता. शासनाकडून यंत्रमाग व्यवसायाला दिल्या जाणार्‍या वीज सवलतीचा लाभ जाहीर घोषणा करुनही अंमलबजावणी होत नसल्याने मिळत नव्हता. या संदर्भात आमदार प्रकाश आवाडे यांनी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा सुरु ठेवला होता. वीज सवलतीसाठी ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीची किचकट अट रद्द करावी ही मागणी आमदार आवाडे यांनी सातत्याने लावून धरली होती. या संदर्भात मार्च महिन्यात कोरोची (ता. हातकणंगले) येथे झालेल्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 27 अश्‍वशक्तीखालील व 27 अश्‍वशक्तीवरील यंत्रमागांना वीज सवलत निश्‍चितपणे देण्यात येईल असे जाहीर केले होते. त्याचबरोबर लोकसभा निवडणूकीतही मुख्यमंत्री शिंदे यांनी इचलकरंजीत कोणत्याही परिस्थितीत वीज सवलतीचा लाभ मिळणार अशी घोषणा केली होती. त्यानंतर पावसाळी अधिवेशनातही मुख्यमंत्र्यांनी वीज सवलत देण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर या प्रश्‍नी माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे पाठपुरावा सुरु ठेवला होता.

परंतु, वीज सवलत संदर्भात राज्य मंत्रीमंडळाच्या कॅबिनेटमध्ये झालेल्या बैठकीत ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीचा उल्लेख काढला न गेल्याने प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यात अडचण निर्माण झाली होती. ऑनलाईन व ऑफलाईनची अट रद्द करुन वीज सवलतीची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी अशी मागणी आमदार आवाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे लावून धरली होती. त्यांनीही लवकरच कॅबिनेटची बैठक घेऊन हा प्रश्‍न मार्गी लावण्याची ग्वाही दिली होती. त्या अनुषंगाने मंगळवारी (13 ऑगस्ट) रोजी कॅबिनेटची बैठक होऊन त्यामध्ये वीज सवलतीच्या लाभासाठी असलेली ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीची अट रद्द करण्यात आली. त्यामुळे 27 अश्‍वशक्तीखालील यंत्रमागाला प्रतियुनिट 1 रुपया व 27 अश्‍वशक्तीवरील यंत्रमागाला अतिरिक्त 75 पैसे वीज सवलतीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

यंत्रमाग व्यवसायाला वीज सवलतीचा लाभ देण्याचा निर्णय घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वस्त्रोद्योगाला नव्याने ऊर्जितावस्था दिली असून आगामी काळात हा वस्त्रोद्योग उत्तुंग भरारी घेईल असे सांगत आमदार प्रकाश आवाडे यांनी राज्य शासनाचे आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -