Sunday, December 22, 2024
Homeइचलकरंजीमराठी मिडीयम हायस्कुलने संत नामदेव महाराज संजीवन समाधी महोत्सव आंतरशालेय स्पर्धेचे सर्वसाधारण...

मराठी मिडीयम हायस्कुलने संत नामदेव महाराज संजीवन समाधी महोत्सव आंतरशालेय स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद सलग सातव्यांदा पटकावले”*

संत शिरोमणी नामदेव

महाराज यांच्या ६७४ व्या संजीवन समाधी महोत्सवानिमित्त आंतरशालेय स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. नामदेव समाज सेवा मंडळ आणि नामदेव युवक संघटना यांच्या वतीने चित्रकला, सामान्यज्ञान, निबंध, बुद्धिबळ, वक्तृत्व, पाठांतर, गायन,वेशभूषा आदी स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्यामध्ये शहर आणि परिसरातील १०६ शाळांतील विविध गटांतील सुमारे अडीच हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.इचलकरंजी शहर व परिसरामध्ये प्रतिष्ठतेच्या मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद सलग *सातव्यांदा* डीकेटीईचे मराठी मिडियम हायस्कूल नारायण मळा, प्रशालेने पटकावून आपले निर्विवाद वर्चस्व निर्माण केले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचे वकील पद्मनाभ पिसे, संदीप लचके, सुभाष मुळे, रणजित माळवदे यांच्या उपस्थितीत विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले.

यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना संस्थेच्या मानद सचिव डॉ. सौ.सपनाआवाडे(वहिनी),प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.नंदकुमार गाडेकर सर

यांचे प्रोत्साहन लाभले.तसेच प्रशालेच्या बाह्य परीक्षा विभाग प्रमुख सौ. काकडे एस.आर,सौ.देवमोरे एम.ए, सौ.चौगुले एन.ए, श्री.पाटील एस.जे,श्री.शिंदे पी.टी, श्री.केंगार के.एस,श्री.संभाजी बंडगर व श्री.कार्तिक बचाटे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -