Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगमुकेश अंबानींच्या लेकीची 100 कोटींची डील, थेट टाटा-नायकाला टक्कर, देशात येणार ग्लोबल...

मुकेश अंबानींच्या लेकीची 100 कोटींची डील, थेट टाटा-नायकाला टक्कर, देशात येणार ग्लोबल ब्रँड

आशिया खंडातील सर्वात मोठे उद्योजक अन् श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची कंपनी आणखी एक डील करत आहे. मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिच्याकडे रिटेल उद्योगाची जबाबदारी आहे. ईशाने रिटेलची कमान सांभाळल्यानंतर रिटेल बिजनेसमध्ये मोठ, मोठ्या कंपन्यांचे अधिग्रहण केले आहे. अनेक आंतरराष्ट्रीय ब्यूटी बँडसोबत करार केला. आता आणखी एक ब्यूटी आणि कॉस्मेटिक ब्रँण्डची रिलायन्स भारतात आणत आहेत.

 

शंभर कोटींची डील

ईशा अंबानी यांनी रिलायन्स रिटेलची कमान सांभाळल्यानंतर अनेक मोठ्या डिल केल्या. वर्साचे (Versace), अरमानी (Armani), बालेनियागा (Balenciaga), बॉस (Boss) यासारखे आंतरराष्ट्रीय बँड भारतात आणले. त्यानंतर आता इटलीमधील फॅशन आणि ब्यूटी ब्रँड किको मिलानो (Kiko Milano) भारतात आणत आहे. या कंपनीच्या अधिग्रहणासाठी अनेक महिन्यांपासून चर्चा सुरु होती. त्यात ईशा अंबानी यांच्या रिलायन्स रिटेलला यश आले आहे. भारतात किको मिलानोची उत्पादने विकण्यासाठी 100 कोटींची ही डील आहे. यामुळे टाटा आणि नायकाला चांगली स्पर्धेक मिळणार आहे.

 

टाटा, नायकाला स्पर्धेक

ईशा अंबानी ब्यूटी मार्केटमध्ये आपले जाळे पसरवत आहे. त्यामुळे टाटासह दुसऱ्या ग्लोबल बँडला ईशा अंबानींकडून टक्कर मिळणार आहे. टाटाची लॅक्मे, टाटा क्लिक सारखे ब्रँण्ड मार्केटमध्ये आहेत. तसेच ईशा अंबानी देशभरात 20 नवीन ब्यूटी स्टोर ओपन करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे LVMH , Sephora आणि नायका सारख्या ब्यूटी ब्रँडला आव्हान मिळणार आहे. देशात ब्यूटी आणि केअर मार्केट 16 अब्ज डॉलरचा आहे.

 

सहा शहरांमध्ये स्टोअर

इटलीचा लोकप्रिय कॉस्मेटिक ब्रँड किको मिलानो भारत येत आहे. त्याचे स्टोअर दिल्ली, मुंबई, पुणे, लखनौसह देशभरातील सहा शहरांमध्ये सुरू होणार आहेत. ब्युटी ब्रँड किको मिलानो 1997 मध्ये इटलीमध्ये सुरू करण्यात आला होता. त्यांचे 1200 हून अधिक स्किन केअर आणि ब्युटी केअर उत्पादने आहेत. आता ही कंपनी रिलायन्स रिटेलच्या सहकार्याने भारतात आपली उत्पादने विकणार आहे

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -