Sunday, December 22, 2024
Homeमनोरंजन‘तुझ्यासारखी कितीही नवी लोकं..’; पॅडी कांबळेबद्दल बोलणाऱ्या जान्हवीला सिद्धार्थने सुनावलं

‘तुझ्यासारखी कितीही नवी लोकं..’; पॅडी कांबळेबद्दल बोलणाऱ्या जान्हवीला सिद्धार्थने सुनावलं

‘बिग बॉस मराठी 5’मध्ये नुकताच एक टास्क पडला आणि टास्कच्या शेवटी दोन्ही गटात पुन्हा वाद झाले. या वादादरम्यान जान्हवी किल्लेकरने पंढरीनाथ कांबळेच्या करिअरवरून टिप्पणी केली. “पंढरीनाथ आयुष्यभर ओव्हरअ‍ॅक्टिंग करून थकले आहेत,” असं जान्हवी म्हणाली. तिच्या या वक्तव्यावरून बिग बॉसच्या घरात आणि आता बाहेरही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. विशाखा सुभेदार, अभिजीत केळकर, मेघा धाडे, सुरेखा कुडची यांसारख्या कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित जान्हवीला सुनावलं आहे. पंढरीनाथची मुलगी ग्रिष्मा कांबळेनंही पोस्ट लिहित जान्हवीचा समाचार घेतला आहे. आता अभिनेता सिद्धार्थ जाधवचीही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. जान्हवीच्या ‘ओव्हरअ‍ॅक्टिंग’ या कमेंटवरून सिद्धार्थने तिला सुनावलं आहे.

 

सिद्धार्थ जाधवची पोस्ट-

‘जोकर, बरं मग… ओव्हरॲक्टिंग, बरं मग.. पण या ओव्हरॲक्टिंग करणाऱ्या जोकरचा संयम दिसत नाही का तुला? एकदा का तो सुटला की तुझी बिग बॉस मराठीमधली ओव्हरॲक्टिंगवाली जोकरगिरी पण दिसणार नाही. याला म्हणतात अनुभव. तुझ्यासारखी कितीही (जा) नवी लोकं आली ना, तरी एक गोष्ट कायम लक्षात ठेव.. जुनं तेच सोनं.. आणि माझा भाऊ प्रेमाने जग जिंकणारा आहे’, अशा शब्दांत सिद्धार्थने जान्हवीला सुनावलं आहे.

 

सिद्धार्थच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘ए टीममधील जान्हवी आणि निक्की या दोघी प्रत्येक आठवड्यात कोणाच्या तरी खासगी आयुष्यावरून टिप्पणी करतात आणि नंतर नाटक करून मागी मागतात. या शोमधून नक्की काय साध्य करायचं आहे हेच कळत नाही’, असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. जान्हवीच्या या वक्तव्यावरून मराठी कलाविश्वात चांगलीच नाराजी निर्माण झाली आहे. आता ‘भाऊचा धक्का’ या एपिसोडमध्ये सूत्रसंचालक रितेश देशमुख जान्हवीला काय म्हणतोय, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

‘जेव्हा गेम बाहेर असलेल्या तुझ्या लेकराचा विनाकारण उल्लेख झाला तेव्हा तुला ते पटलं नाही. आज तू गेम बाहेरच्या, बाबाने लेकरासारखाच वाढवलेल्या, फुलवलेल्या करिअरविषयी एवढं बोललीस ते मात्र तुला पटलं? हा तुझा ‘फेअर गेम’ संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय एवढं लक्षात ठेव,’ अशा शब्दांत पंढरीनाथच्या मुलीने जान्हवीला सुनावलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -