Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रफ्लिपकार्टच्या ग्राहकांना झटका; प्रत्येक ऑर्डरवर द्यावे लागणार अतिरिक्त पैसे

फ्लिपकार्टच्या ग्राहकांना झटका; प्रत्येक ऑर्डरवर द्यावे लागणार अतिरिक्त पैसे

काही महिन्यांपूर्वी स्विगी आणि झोमॅटो या ऑनलाइन प्लॅटफॉर्मने ग्राहकांकडून प्रत्येक ऑर्डरवर फी घेण्यास सुरुवात केलेली होती. अशातच आता फ्लिपकार्टने देखील त्यांच्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आणलेली आहे. ती म्हणजे आता फ्लिपकार्ट देखील प्रत्येक ऑर्डरवर त्यांच्या ग्राहकांकडून 3 रुपये प्लॅटफॉर्म फी घेणार आहे. अलीकडे झोमॅटो आणि स्विगीने देखील त्यांच्या प्लॅटफॉर्म फीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे.

फ्लिपकार्टने (Flipcart) ऑनलाइन पेमेंट आणि कॅश ऑन डिलिव्हरी या दोन्हींवर हे शुल्क चालू केलेले आहे. फ्लिपकार्ट ही फी प्लस प्रोग्रॅम आणि नॉन प्लस प्रोग्रॅम या दोन्ही युजर्सकडून घेणार आहे. परंतु जर तुम्ही फ्लिपकार्ट मोबाईल ॲप किंवा वेबसाईटवरून जर 10 हजार रुपयांपेक्षा जास्त खरेदी केली, तर हे शुल्क आकारले जाणार नाहीत.

 

शुल्क कधी आकारले जाणार | Flipcart

झोमॅटो स्विगीनंतर फ्लिपकार्टने 17 2024 पासून अतिरिक्त शुल्क आकारण्यास सुरुवात केलेली आहे. या कंपनीचे असे म्हणणे आहे की, यामुळे प्लॅटफॉर्म कार्यक्षमतेने चालवता येते. आणि त्यात सुधारणा देखील करण्यात करता येते. परंतु सध्या ॲमेझॉन हे प्लॅटफॉर्म कोणत्याही प्रकारची प्लॅटफॉर्म फी घेत नाही. अमेझॉन ही फ्लीपकार्टची सगळ्यात प्रमुख अशी प्रतिस्पर्धी कंपनी आहे.

 

फि का घेत आहेत?

झोमॅटो आणि स्विगी या लोकप्रिय ऑनलाइन प्लॅटफॉर्मने त्यांचा नफा आणि महसूल वाढवण्यासाठी त्यांच्या प्लॅटफॉर्म फीमध्ये वाढ केलेली आहे. जानेवारीमध्येच ही फी वाढवलेली आहे. जानेवारीमध्ये स्विगीने त्यांच्या काही निवडक यूजरसाठी 10 रुपये प्लॅटफॉर्म फी सुरू केलेली आहे. याआधी मार्केटमध्ये या कंपन्यांकडून 5 रुपये शुल्क आकारले जात होते. सध्या स्विगी 7 रुपये प्लॅटफॉर्म फी घेत आहेत. दोन्ही कंपन्यांनी मागील वर्षीही प्लॅटफॉर्म सुरू केली होती. सुरुवातीला प्रत्येक ऑर्डरवर ते 2 रुपये एवढी प्लॅटफॉर्म फी घेत होते. परंतु आता तीच प्लॅटफॉर्म फी 10 रुपये झालेली आहे.

 

याबद्दल माहिती देताना कॅपिटल माईंडचे सीईओ दीपक सेना यांनी सोशल मीडियावर माहिती दिलेली आहे. त्यांनी म्हटले आहे की, प्लॅटफॉर्म फी ग्राहकांना त्रास देणार आह म्हणूनच मी आता स्विगी आणि झोमॅटोपासून अंतर ठेवायला सुरुवात केलेली आहे. आणि हे करताना मला खूप आनंद होत आहे. यावर त्यांनी असे लिहिलेली आहे की, या कंपन्या प्रत्येक ऑर्डरवर ग्राहकांकडून 6 रुपये घेत आहे. याशिवाय हे लोक रेस्टॉरंटमधून हेच फी 30 टक्के घेतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -