गेल्या कित्येक वर्षांपासून भारतीय पुरुष क्रिकेट संघासाठी मैदानावर धावांचा पाऊस पाडणाऱ्या शिखर धवन (Shikhar Dhawan) या भारताच्या दिग्गज क्रिकेटपटून मोठा निर्णय घेतला आहे. त्याने क्रिकेटमधून निवृत्त होण्याचं जाहीर केलं आहे. हा निर्णय धवनने आपल्या माजमाध्यम खात्यांवरून जाहीर केला आहे. त्याने नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. आपल्या व्हिडीओत त्याने क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं आहे.
शिखर धवनने आंतराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं आहे. त्याने साधारण 1 मिनिट 17 सेकंदांचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्याच्या या व्हिडीओमध्ये त्याने सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत. क्रिकेट शिकवणारे त्याचे गुरु, सहकारी, बीसीसीआय, आयसीसा अशा सर्वांचे आभार मानत धवनने मी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं आहे.
शिखर धवन भारतीय क्रिकेट संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून ओळखला जायचा. विशेष म्हणजे एकदा मैदानावर उतरल्यानंतर तो आक्रमकपणे खेळून समोरच्या गोलंदाजाला घाम फोडायचा. त्याची आक्रमक फलंदाजी पाहूनच भारतीय संघात तो फलंदाजीसाठी सलामीला यायचा. त्याने आतापर्यंत 34 कसोटी, 167 एकदिवसीय तसेच 68 सामने खेळलेले आहेत. 38 वर्षीय शिखर धवन साधारण 2022 पासून भारतीय क्रिकेट संघाच्या बाहेर होता
.