Sunday, February 23, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर जिल्ह्यात पावसाला पुन्हा सुरूवात ; पहा कुठे किती पाऊस

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाला पुन्हा सुरूवात ; पहा कुठे किती पाऊस

गेल्या दहा पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी रात्रीपासून पावसाची पुन्हा दमदार सुरुवात झाली आहे. शुक्रवारी रात्रीपासून सुरु झालेल्या पावसामुळे मात्र कोल्हापूर शहरातील जनजीवन विस्कळीत झाले असून रस्ते, बाजारपेठामध्ये फारशी गर्दी दिसत नव्हती.

 

ग्रामीण भागातही पावसाची दमदार हजेरी लागल्याने पीकांना हा पाऊस उपयोगी ठरत असल्याने शेतकरी मात्र सुखावला आहे. शनिवारी दिवसभर पावसाची संततधार सुरुच होती.

जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी सकाळपर्यंत एकूण सरासरी २९.४ मिमी पाऊस पडला असून गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ४९.३ मि.मीटर पाऊस झाला आहे. गेल्या २४ तासात पडलेला तालुकानिहाय पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे- हातकणंगले – २२.३ मिमी, शिरोळ – १३.५ मिमी, पन्हाळा- ४२ मिमी, शाहुवाडी – ४५.३ मिमी, राधानगरी- २८ मिमी, गगनबावडा- ४९.३ मिमी, करवीर- २१.६ मिमी, कागल- २२.६ मिमी, गडहिंग्लज – २६.३ मिमी, भुदरगड – ४०.२ मिमी, आजरा – ४२.६ मिमी, चंदगड- ३७.९ मिमी असा आहे. दरम्यान जिल्हयात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -