Saturday, July 27, 2024
Homeकोल्हापूरइचलकरंजी बाजारपेठेत प्लास्टीक पिशव्या जप्त

इचलकरंजी बाजारपेठेत प्लास्टीक पिशव्या जप्त


इचलकरंजी येथील आठवडा बाजार, फळ बाजार मधील फळ विक्रेते व्यापाऱ्यांकडून सुमारे ४० किलो प्लास्टीक पिशव्या जप्त केल्या . प्लास्टिक पिशव्या न वापरणे बाबत सूचना दिल्या.

विकली मार्केट, थोरात चौक, अण्णा रामगोंडा मार्केट, डेक्कन बाजार येथील बाजारामध्ये पालिकेने नेमलेल्या कर्मचाऱ्यांच्या पथकाने प्लास्टिक जप्ती मोहीम राबवली सर्व व्यापाऱ्यांना कडक सूचना देऊन नगर परिषदेकडून दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला. तेथून पुढे प्लास्टिक जप्ती मोहीम त्याचबरोबर मास्क न वापरणे, उघड्यावर कचरा टाकणे, सार्वजनिक ठिकाणी घाण करणे इत्यादीबाबत नगरपालिकेकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. पथकामध्ये सीएसआय चव्हाण, एसआय विजय पाटील, रफिक पेंढारी, सर्जेराव पाटील, महादेव मिसाळ, मंगेश दुरुगकर, तानाजी कांबळे, सुनील कांबळे,लहू लाखे, विकास लाखे, सागर तोरणे, विनोद आवळे आदींचा समावेश होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -