Friday, June 21, 2024
Homeकोल्हापूरशिवाजी विद्यापीठ सेवक संघाचे सरचिटणीस अतुल ऐतावडेकर यांचे निधन

शिवाजी विद्यापीठ सेवक संघाचे सरचिटणीस अतुल ऐतावडेकर यांचे निधन


शिवाजी विद्यापीठ सेवक संघाचे सरचिटणीस अतुल जयवंत ऐतावडेकर (वय ५४) यांचे हृदयविकाराने आज (गुरुवार) पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, दोन भाऊ असा मोठा परिवार आहे.

ऐतावडेकर हे शिवाजी विद्यापीठात सहाय्यक अधीक्षक पदावर कार्यरत होते. विद्यापीठ सेवक संघाचे माजी सरचिटणीस व खजानिस म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे पश्चिम विभागीय समन्वयक म्हणून ते कार्यरत होते. 2011 _ 12 रोजी त्यांना शिवाजी विद्यापीठ आजी-माजी कृती समितीच्यावतीने त्‍यांना ‘शिव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

नुकतेच ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचा पुरस्कारदेखील त्यांना मिळाला होता. गुरूवारी पहाटे अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. नुकतेच विद्यापीठ सेवक संघाचे नेते बाबा सावंत यांचे निधन झाले. त्यातच ऐतावडेकर यांच्या निधनाने विद्यापीठ सेवक संघ व शिवाजी विद्यापीठावर शोककळा पसरली आहे. शुक्रवारी ११ वाजता पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -