Thursday, September 19, 2024
Homeमनोरंजन‘ती कायम दुसऱ्याची पत्नी राहिली…’, ऐश्वर्या राय बद्दल असं का म्हणाला प्रसिद्ध...

‘ती कायम दुसऱ्याची पत्नी राहिली…’, ऐश्वर्या राय बद्दल असं का म्हणाला प्रसिद्ध अभिनेता?

अभिनेत्री ऐश्वया राय कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. ऐश्वर्या हिने अनेक सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण गेल्या काही वर्षांपासून अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर आहे. पण कोणत्या न कोणत्या कारणासाठी अभिनेत्री चर्चेत असते. नुकताच झालेल्या एका मलुखातीत प्रसिद्ध अभिनेत्याने ऐश्वर्या हिच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ‘ऐश्वर्या कायम दुसऱ्याची पत्नी राहिली…’ असं वक्तव्य अभिनेत्रीने केलं. ज्यामुळे अभिनेत्यासह ऐश्वर्या राय देखील चर्चेत आली आहे.

 

ऐश्वर्या राय बद्दल असं वक्तव्य करणारा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही तर, अभिनेता चियान विक्रम आहे. सध्या चियान ‘तंगलान’ सिनेमामुळे चर्चेत आहे. चियान आणि ऐश्वर्या यांनी ‘पोन्नियिन सेल्वन 2’ सिनेमात एकत्र स्क्रिन शेअर केली आहे. सिनेमातील दोघांच्या केमिस्ट्रीला देखील चाहत्यांनी डोक्यावर घेतलं.

 

नुकताच झालेल्या मुलाखतीत अभिनेता म्हणाला, ‘अभिषेक माझा खूप चांगला मित्र आहे. त्यामुळे बच्चन कुटुंबासोबत देखील मैत्रीपूर्ण संबंध आहेत. सांगायचं झालं तर, ऐश्वर्या आणि माझी ऑनस्क्रिन केमिस्ट्री चांगली आहे. रावण किंवा पोन्नियिन सेल्वन दोन्ही सिनेमांमध्ये आमची प्रेम कहाणी अधुरी राहिली… दोन्ही सिनेमांमध्ये दुसऱ्याची पत्नी राहिली आणि माझं निधन झालं…’

 

अभिनेता पुढे म्हणाला, ‘दिग्दर्शत मणिरत्नम यांना मी सांगितलं आहे कोणत्यातरी सिनेमात ऐश्वर्या आणि माझा शेवट आनंदी असू द्या… चाहत्यांसाठी तरी शेवट आनंदी ठेवा…’ दरम्यान, चियान याने ऐश्वर्याचं कौतुक देखील केलं. ‘ऐश्वर्या एक उत्तम अभिनेत्री आहे. तिच्या कामासाठी ऐश्वर्या प्रामाणिक आहे आणि आम्ही चांगले मित्र आहोत..’ असं देखील अभिनेता म्हणाला.

 

चियान याच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, ‘तंगलान’ सिनेमाचा सर्वत्र बोलबाला पाहायला मिळत आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर देखील तगडी कमाई करताना दिसत आहे. सिनेमाने बॉक्स ऑफिवर 100 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. तर, ऐश्वर्या हिने अद्याप आगामी प्रोजेक्टचा कोणताही खुलासा केलेला नाही.

 

ऐश्वर्या सध्या फार कमी सिनेमांमध्ये दिसते. अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यात व्यस्त आहे. ऐश्वर्या राय हिने 2007 मध्ये अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर अभिनेत्रीने 2011 मध्ये लेक आराध्या हिला जन्म दिला. आराध्या आणि ऐश्वर्या यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -