Friday, February 27, 2026
Homeब्रेकिंगबिग बॉस मराठी 5’च्या सदस्यांना बसणार जबरदस्त शॉक; वर्षा उसगांवकरांचा एकच कल्ला

बिग बॉस मराठी 5’च्या सदस्यांना बसणार जबरदस्त शॉक; वर्षा उसगांवकरांचा एकच कल्ला

बिग बॉस मराठी 5’चा खेळ अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचला आहे. ‘भाऊचा धक्क्या’वर आज सदस्यांना जबरदस्त शॉक बसणार आहे. माणसं ओळखायला चुकल्याने सदस्यांना हा शॉक बसणार आहे.

 

रितेश सदस्यांना प्रश्न विचारतो. त्या प्रश्नाचं उत्तर जर चुकलं तर त्या सदस्याला शॉक दिला जातो. ‘भाऊचा धक्क्या’वर रितेश हा अंकिता आणि वर्षा उसगांवकरांना प्रश्न विचारतो.

 

“वर्षाताई सध्या घरात कोणत्या सदस्याबद्दल जास्त बोलतात,” असा प्रश्न रितेश विचारतो. अंकिता आणि वर्षाताईंचं उत्तर जर एकच आलं नाही तर त्यांना शॉक देण्यात येतो.

 

वर्षा ताईंनी निक्कीचं नाव लिहिलेलं असतं तर अंकिताने डीपी दादाचं नाव लिहिलेलं असतं. उत्तर चुकल्यामुळे वर्षा ताई अंकितावर चिडतात.

 

वर्षा ताई अंकिताला म्हणतात, “सगळी जनता निक्कीबद्दल बोलतेय, एवढं तरी सामान्य ज्ञान तुला असायला हवं.” उत्तर चुकल्याने वर्षा ताई चांगलाच कल्ला करतात. त्यांचा कल्ला घरातील सर्व सदस्यांचं लक्ष वेधून घेतो.

 

शॉकदरम्यान घनश्याम दराडेचीही चांगलीच तारांबळ उडते. ही सर्व गंमत प्रेक्षकांना ‘भाऊचा धक्का’ या एपिसोडमध्ये पहायला मिळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -