Friday, February 27, 2026
Homeमहाराष्ट्रसप्टेंबरमध्ये पाऊस सक्रिय; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट

सप्टेंबरमध्ये पाऊस सक्रिय; ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

सप्टेंबर महिन्यासुध्दा पावसाचा जोर कायम असणार आहे. आज महिन्याच्या पहिल्याच दिवशी राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.

 

विदर्भातील काही जिल्ह्यांना आज रेड अलर्ट तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

 

विदर्भात कोणता अलर्ट

 

विदर्भात पुन्हा एकदा मान्सून सक्रीय होणार आहे. विदर्भातील यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यात मुळसाधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होणार असल्याने या ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर, अमरावती, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर अकोला, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, वाशिम या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

 

कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, मध्य महाराष्ट्रातील, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, तर मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, लातूर उस्मानाबाद या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर नांदेड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

 

IMD दिलेल्या माहितीनुसार, आज अति तीव्र कमी दाबाचे क्षेत्र ईशान्य बंगालच्या उपसागरावरून वायव्य अरबी समुद्रात आहे. तर ठळक कमी दाबाचे क्षेत्र हे पश्चिम बंगाल मध्ये व लगतच्या वायव्य बंगालच्या उपसागरावर आहे.

 

आज कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

 

हवामान विभागाने आज चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे तेथे रेड अलर्ट दिला आहे.

 

तर नांदेड, अमरावती, गडचिरोली, वर्धा या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वीजांचा कडकडाट व जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे तेथे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.

 

रायगड रत्नागिरी या जिल्ह्यात व पुणे, सातारा व घाट विभागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यात व मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात विजांचा कडकडाट मेघगर्जनेसह ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे येथे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.

 

सोमवारी २ सप्टेंबर रोजी परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती, गडचिरोली, वर्धा या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट

व मेघ गर्जनेसह जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 

त्यामुळे वरील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे तेथे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी तसेच शेतकऱ्यांनी पिकांची योग्य ती देखभाल करावी, असा सल्ला कृषि विभागाने दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -