Thursday, September 19, 2024
Homeराजकीय घडामोडीपवारसाहेब आपसे बैर नही, समरजित तेरी खैर नही" मुश्रीफांचं खुलं चॅलेंज

पवारसाहेब आपसे बैर नही, समरजित तेरी खैर नही” मुश्रीफांचं खुलं चॅलेंज

“पवारसाहेब तुमसे बैर नही, समरजित तुम्हारी खैर नही”, असं म्हणत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेल्या समरजित घाटगेंवर हल्लाबोल केला आहे.

तर कागलमधील निवडणूक ही नायक विरुद्ध खलनायक आहे, असं म्हणत त्यांनी घाटगे यांना डिवचलं आहे. त्यामुळे आगामी काळात कालग विधानसभेची लढत चुरशीची होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या कोल्हापुरात तळ ठोकून आहेत.

पवारांच्या उपस्थितित काल मंगळवारी (ता. ३ सप्टेंबर) शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे (Samarjit Ghatge) यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम कागलमधील गैबी चौकात पार पडला. यावेळी शरद पवार यांच्यासह सर्वच नेत्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

शिवाय थेट मुश्रीफांच्या दारात सभा घेत घाटगेंनी ललकारलं. त्यामुळे यावर मंत्री मुश्रीफ काय उत्तर देणार याची उत्सुकता अनेकांना होती. अशातच आता मुश्रीफांनी (Hasan Mushrif) या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे. शिवाय यावेळी त्यांनी समरजित घाटगे यांना थेट आव्हान देखील दिलं आहे.

माध्यमांशी बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, शरद पवारसाहेब (Sharad Pawar) गैबी चौकात आले आहेत. त्यांनी सातत्याने सांगितलं आहे की, राजा विरुद्ध प्रजा अशी लढत असते आणि त्यामध्ये प्रजा जिंकत असते. परवा जंयत पाटील आले त्यांनी सभा घेतली. काल शरद पवारसाहेबांनी सभा घेतली. माझ्या सारख्या अल्पसंख्याक सामान्य कार्यकर्त्याच्या मागे हे सगळे का लागले आहेत?” असा प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, पत्रकारांनी पवारांचं तुम्हाला आव्हान वाटतं का? असा प्रश्न विचारला असता मुश्रीफ म्हणाले, “निवडणुकीच्या निकालात कळेल. कुठल्याही माणसाला आपण कमी लेखत नाही. पण पवारसाहेब तुमसे बैर नही, समरजित तुम्हारी खैर नही.” अशा शब्दात त्यांनी समरजित घाटगे यांना खुलं चॅलेंज दिलं.

नायक विरूद्ध खलनायक

“एकूण 6 निवडणुका झालेल्या आहेत. त्यामध्ये एकास एक 3 वेळा झाली आहे. पवारसाहेब माझे दैवत आहेत. पण ते माझ्या का लागले हे मला कळत नाही. ही निवडणूक नायक विरूद्ध खलनायक अशी आहे”, म्हणत त्यांनी समरजित घाटगेंवर निशाणा साधला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -