२०२४-२५ या वर्षातील शालेय शासकीय जिल्हास्तर महानगर पालिका १४,१७ आणि १९ या वयोगटातील फुटबॉल स्पर्धेची शुभारंभ मराठी मिडीयम शाळा, नारायण मळा ( डि. के. टी.ई.) याठिकाणी करणेत आली.
या स्पर्धेचा शुभारंभ इचलकरंजी. आमचे महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांच्या हस्ते करणेत आली.याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना आरोग्य अधिकारी यांनी विद्यार्थ्यांनी मैदानी खेळाकडे लक्ष दिले पाहिजे असे आवाहन केले.
यावेळी क्रीडाअधिकारी सूर्यकांत शेटे , सहा.क्रीडा अधिकारी संजय कांबळे, मराठी मिडीयम स्कूलचे मुख्याध्यापक गाडेकर सर क्रीडा पर्येवेक्षक सचिन खोंद्रे, आकाश माने, गुरव सर, बंडगर सर,बरगाले सर अभिजीत बचाटे. , सुहास पवळे, संतोष गायकवाड सर प्रमोद बसागरे सर तुषार जगताप, अमर भिसे सर , पंच जालिंदर सिंग,सर पंच मनोज इनानी सर यांचेसह सर्व शाळांचे कीडाशिक्षक, मार्गदर्शक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन क्रीडा समन्वयक बंडगर सर अभिजीत बचाटे सर यांनी आभार मानले. सदर स्पर्धेत विविध शाळेतील खेळाडू सहभागी झाले होते.






