इचलकरंजी नी
महाराष्ट्राच्या व्यापार, उद्योग, कृषि, सेवा उद्योग क्षेत्रांची शिखर संस्था म्हणून शंभर वर्षापासून कार्यरत असलेल्या ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर’ च्या अत्यंत महत्वपूर्ण अशा तज्ञ विषय समित्यांपैकी एक ’टेक्सटाईल अॅण्ड अॅपरल’ समितीच्या चेअरमन’ पदी माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी निवडीचे पत्र नुकतेच दिले आहे.
’महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर’ ही राज्याच्या व्यापार, उद्योग, कृषि उद्योग व सेवा क्षेत्राची शिखर संस्था असून या ऐतिहासिक कार्यकारीणीमधील महत्वपूर्ण अशा तज्ञ समित्यांच्या पदाधिकार्यांची नियुक्ती प्रक्रिया पुर्णत्वाकडे आहे. त्याच अनुषंगाने टेक्सटाईल अॅण्ड अॅपरल’ समिती चेअरमन पदी डॉ. राहुल आवाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. टेक्सटाईल अॅण्ड अॅपरल समिती चेअरमन या नात्याने गव्हर्निंग काऊन्सील मध्ये ’पदसिध्द सदस्य’ म्हणूनह त्यांची निवड झाली आहे.
डॉ. राहुल आवाडे हे कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना केन कमिटी चेअरमन असून या माध्यमातून त्यांनी सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे आणि आमदार प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजनांद्वारे ऊस उत्पादन वाढीसाठी सतत प्रयत्नशील
आहेत.