Monday, September 16, 2024
Homeइचलकरंजीइचलकरंजीत आजपासून अटल महोत्सव

इचलकरंजीत आजपासून अटल महोत्सव

ताजी बातमी/ ऑनलाईन टीम

 

इचलकरंजीत आज शुक्रवार दिनांक 6 सप्टेंबर 2024 पासून अटल महोत्सवास सुरुवात होत आहे. हा महोत्सव इचलकरंजीत गणेश चतुर्थीच्या दरम्यान गतवर्षीपासून आयोजित करण्यात येत आहे. गतवर्षी या महोत्सवाला भरभरून प्रतिसाद लाभला होता.

 

इचलकरंजीत आज होणाऱ्या या महोत्सवा च्या उद्घाटनाला निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले, खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार सुरेश राव हळवणकर हे प्रमुख अतिथी असणार आहेत.

 

याचबरोबर विलासराव रानडे, अनिल डाळ्या, शहाजी भोसले हे मान्यवर प्रमुख उपस्थित असणार आहेत. यावेळी जयेश बुगड यांच्या हस्ते स्वागत करण्यात येणार आहे. याचबरोबर हेमंत वरुटे, मनोज तराळ, शिवसाई इव्हेंट मॅनेजमेंट अँड अमुजमेंट यांचे सहकार्य लाभणार आहे.

 

अशी माहिती अटल महोत्सवाचे आयोजक श्री शुभम प्रल्हाद बर्गे यांनी दिली आहे. शहर व परिसरासाठी मोठी आनंदाची पर्वणी ठरणाऱ्या आणि लहानांपासून वृद्धांपर्यंत मन द्विगुणित करणाऱ्या अशा या उत्साही अटल महोत्सवांमध्ये शहर व परिसरातील सर्वांनीच लाभ घेण्याचे आवाहन देखील श्री शुभम बर्गे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -