अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यासाठी संघ जाहीर केला आहे. अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात भारतात हा एकमेव सामना होणार आहे. न्यूझीलंड क्रिकेट टीम भारतात पोहचली आहे. अफगाणिस्तानने जाहीर केलेल्या संघात राशिद खान याचा समावेश करण्यात आलेला नाही. राशिदला दुखापतीमुळे या सामन्याला मुकावं लागलं आहे. राशिदला द हन्ड्रेड स्पर्धेदरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळे आता या सामन्यात हशमतुल्लाह शाहिदी अफगाणिस्तानचं नेतृत्व करणार आहे.
उभयसंघातील हा सामना 9 सप्टेंबरपासून नोएडा येथे खेळवण्यात येणार आहे. अफगाणिस्तानचा हा न्यूझीलंड विरुद्धचा पहिला कसोटी सामना असणार आहे. तर अफगाणिस्तानने त्यांचा पहिला कसोटी सामना हा टीम इंडिया विरुद्ध 2018 साली खेळला होता, तेव्हा त्यांना पराभूत व्हावं लागलं होतं.अफगाणिस्तानच्या 16 सदस्यीय संघात 3 अनकॅप्ड खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. राशिद खान याच्या अनुपस्थितीत जहीर खान आणि जिया उर रहमान हे दोघे स्पिन बॉलिंगची जबाबदारी सांभाळतील.
अफगाणिस्तान टीम या सामन्यासाठी काही दिवसांआधीच भारतात दाखल झाली. अफगाणिस्तानचा 19 सदस्यीय प्राथमिक संघ भारतात आला. त्यानंतर त्यांनी सराव केला. त्यानंतर कामगिरीच्या आधारावर 19 पैकी 16 खेळाडूंची निवड करण्यात आली. राशिद व्यतिरित्त टीममध्ये आणखी दोघांचा समावेश नाही. गुलाबदीन नईब आणि वेगवान गोलंदाज नवीन जादराण यांचा समावेश नाही. वेगवान गोलंदाज नवीन जादराण याला दुखापतीमुळे या सामन्याला मुकावं लागलं आहे.
एकमेव कसोटीसाठी अफगाणिस्तानचा संघ
एकमेव कसोटी सामन्यासाठी अफगाणिस्तान टीम : हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), इब्राहिम झादरान, रहमत शाह, अब्दुल मलिक, रियाज हसन, अफसर जजई (विकेटकीपर), इकराम अलीखिल (विकेटकीपर), बाहिर शाह, शाहिदुल्लाह कमाल, अजमतुल्लाह उमरजई, शम्स उर रहमान, जिया उर रहमान, जहीर खान, कैस अहमद, खलील अहमद आणि निजात मसूद.
न्यूझीलंड टीम : टीम साउथी (कॅप्टन), टॉम लॅथम (उपकर्णधार), केन विलियम्सन, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), मायकल ब्रेसवेल, डेवोन कॉनव्हे, मॅट हेनरी, डेरिल मिचेल विल ओरूर्के, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचीन रवींद्र, मिचेल सँटनर, बेन सियर्स आणि विल यंग.