Thursday, September 19, 2024
Homeइचलकरंजीइचलकरंजी : लेखीपत्र दिल्याने 'ते' उपोषण मागे

इचलकरंजी : लेखीपत्र दिल्याने ‘ते’ उपोषण मागे

इचलकरंजी

इचलकरंजी शहरातील सर्वच भागातील रस्त्यांसाठी नगरोत्थान महाअभियान योजना रस्ते विकास प्रकल्प अंतर्गत मंजूर 51.95 कोटी रुपयांच्या कामांसाठी महानगरपालिका प्रशासनाकडून एनओसी (नाहरकत) संदर्भातील लेखीपत्र देण्यात आल्याने ताराराणी पक्षाच्या वतीने महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारात सुरु करण्यात आलेले आमरण उपोषण मागे घेण्यात आले.

इचलकरंजीत शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी आमदार प्रकाश आवाडे व माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून नगरोत्थान महाभियानांतर्गत 51.95 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. परंतु या कामांसाठी आवश्यक एनओसी महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यास विलंब केला जात असल्याने कामे सुरु होण्यास उशीर होत आहे. त्यामुळे रस्त्यांची दूरवस्था दूर होण्यासाठी तातडीने या कामांची एनओसी द्यावी अशी मागणी करत 4 सप्टेंबर रोजी ताराराणी पक्षाच्या वतीने उपायुक्त प्रसाद काटकर यांची भेट घेत त्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. यावेळी विविध प्रश्‍नांवरुन तसेच कामांबद्दल विचारणा करता समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने अधिकार्‍यांवर प्रश्‍नांचा भडीमार करण्यात आला होता. अखेर उपायुक्त प्रसाद काटकर यांनी, 51.95 कोटीच्या कामांसाठीची एनओसी दोन दिवसांत देण्याची ग्वाही दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. तर शुक्रवारपर्यंत एनओसी न मिळाल्यास महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारात आमरण उपोषण सुरु करण्याचा इशारा ताराराणी पक्षाच्या वतीने देण्यात आला होता.

त्यानुसार शुक्रवारी एनओसी न मिळाल्याने सोमवारी सकाळी दीपक सुर्वे, सतिश मुळीक, नितेश पोवार, इम्रान मकानदार, सचिन हेरवाडे, राहुल घाट, नरसिंह पारीक, सुहास कांबळे, अक्षय बरगे, सुबोध कोळी, फहिम पाथरवट, समीर मुल्ला, फिरोज कुमडगी आदींनी आमरण उपोषण सुरु केले होते. दोन तासाच्या आंदोलनानंतर बांधकाम विभागाचे शाखा अभियंता महेंद्र क्षिरसागर यांनी कामासंदर्भाती एनओसी चे लेखीपत्र दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. एनओसी मिळाल्याने रस्ते कामांना लवकरच सुरुवात होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -