Tuesday, July 29, 2025
Homeमहाराष्ट्र'तू घाणेरड्यासारखंच राहा''; जान्हवीने आर्याला सुनावलं, काय झालं नेमकं?

‘तू घाणेरड्यासारखंच राहा”; जान्हवीने आर्याला सुनावलं, काय झालं नेमकं?

‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन (Bigg Boss Marathi Season 5) सुरू होऊन 44 दिवस पूर्ण झाले आहेत. बिग बॉसचा खेळ आता सातव्या आठवड्यात पोहचला आहे. बिग बॉसच्या घरात कधी काय होईल, याचा काही नेम नाही. मैत्रीच्या नात्यात कधी बदल होईल, समीकरणे सतत बदलत असतात. आता, पुन्हा नव्याने मैत्री करणाऱ्या जान्हवी किल्लेकर (Jahnavi Killekar) आणि आर्या जाधवमध्ये (Aarya Jadhav) जोरदार वादावादी झाली आहे. जान्हवीने तर आर्याला थेट ”तू घाणेरड्यासारखंच राहा” असंच सुनावले.

 

बिग बॉस मराठी’च्या घरात पहिल्या दिवसापासून सदस्यांच्या भांडणांना सुरुवात झाली आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात कधी कोणामध्ये वाद होईल हे सांगू शकत नाही. दोन सख्खे मित्र कधी वैरी होतील हे सांगता येत नाही. ‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात जान्हवी आणि आर्याचे कडाक्याचं भांडण झालेलं पाहायला मिळणार आहे.

 

 

‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये, जान्हवी आर्याला म्हणत आहे,”तुला वॉशरुम साफ करता येत नाही… भांडी घासता येत नाही…करता काय येतं मग तुला?”. त्यावर आर्या जान्हवीला म्हणते,”तू स्वत: पहिले क्लिन कर”. जान्हवी पुढे म्हणते,”मला चूक दिसली तर दिसली आर्या. तुला घाणेरड्यासारखं राहायला आवडतं तर घाणेरड्यासारखचं राहा” असे सुनावते.

 

संग्रामच्या वाइल्ड कार्ड एन्ट्रीने धुरळा

 

बिग बॉस मराठीच्या घरात ‘मिस्टर इंडिया’, ‘मिस्टर वर्ल्ड’ राहिलेला संग्राम चौगुलेची एन्ट्री झाली आहे. एन्ट्री झाल्यानंतर बिग बॉसने संग्रामला घरातील सदस्यांना नॉमिनेट करण्यास सांगितले. ज्यांना नॉमिनेट करायचे होते, त्यांना पाण्यात ढकलायचे होते. संग्रामने निक्कीला नॉमिनेट केल्यावर तिने पाण्यात उतरण्यास नकार दिला. मात्र, त्यानंतरही संग्रामने तिला पाण्यात ढकलले. यावरून संग्राम आणि निक्कीमध्ये वादावादी झाल्याचे दिसून आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -