Thursday, February 6, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी : वीज सवलतीची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु : आमदार प्रकाश आवाडे ...

इचलकरंजी : वीज सवलतीची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु : आमदार प्रकाश आवाडे इचलकरंजी परिसरातील यंत्रमागधारकांना मिळणार 40 कोटीचा लाभ

इचलकरंजी –

27 एच. पी. वरील व खालील यंत्रमागाला अनुक्रमे प्रति युनिट 75 पैसे व 1 रुपया अतिरिक्त वीज सवलतीचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. १५ मार्च २०२४ पासूनच्या सवलतीच्या एकूण सवलतीपैकी ५० टक्के सवलत चालू सप्टेंबर महिन्यातील बिलातून तर उर्वरित ५० टक्के सवलत ऑक्टोबरच्या बिलातून कमी होणार. यामुळे इचलकरंजी शहर व परिसरातील साध्या व शटललेस यंत्रमागधारकांना अंदाजे 40 कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली.

सवलतीची अंमलबजावणी तातडीने व्हावी यासाठी आमदार आवाडे दोन दिवसापासुन मुंबईत ठाण मांडून आहेत. यासाठी आमदार प्रकाश आवाडे व माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांनी सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता त्याला यश आले आहे.

या सवलतीचा प्रत्यक्ष लाभ कधीपासुन व केव्हा मिळणार याबाबत उलटसुलट चर्चा होती. तर आमदार प्रकाश आवाडे यांनी 15 मार्च 2024 पासून लाभ मिळणार हे ठामपणे सांगत होते. मागील दोन दिवसापासुन आमदार आवाडे हे मुंबईत ठाण मांडून असून त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे वीज सवलतीची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु झाल्याने यंत्रमागधारकांतून समाधान व्यक्त होत आहे.

यंत्रमाग व्यवसायला गरजेची असलेली वीज सवलत संदर्भात १५ मार्च २०२४ रोजी निर्णय होऊन २७ एच.पी. खालील यंत्रमागधारकांना प्रति युनिट अतिरिक्त १ रुपया व २७ एच.पी. वरील यंत्रमागधारकांना प्रति युनिट ७५ पैसे अतिरिक्त वीज सवलत देण्याचे ठरले. तर वीज सवलत मिळणेसाठी ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीची घालण्यात आलेली अट २ सप्टेंबर २०२४ च्या शासन निर्णयाने कायमस्वरूपी कमी करणेत आली. या निर्णयामुळे १५ मार्च २०२४ पासून वापरलेल्या युनिटमधून २७ एच.पी. खालील व वरील यंत्रमागधारकांचे एकूण वापराच्या युनिटमधून 1 रुपये व 75 पैसे याप्रमाणे होणाऱ्या रक्कमेपैकी ५०टक्के रक्कम चालू सप्टेंबर महिन्याच्या वीज बिलातून वजा झालेली आहे. तर उर्वरित ५० टक्के रक्कम ऑक्टोबर महिन्याच्या वीज बिलातून वजा होणार आहे. तर नोव्हेंबरपासून नियमित वीज बिले सवलतीच्या दराने येतील.

वीज सवलतीच्या अंमलबजावणीमुळे इचलकरंजी शहर व परिसरातील यंत्रमागधारकांना अंदाजे 40 कोटी रुपयाचा लाभ होणार आहे. या कामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे आमदार आवाडे यांनी सांगितले

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -