Sunday, December 22, 2024
Homeइचलकरंजीखेळायला, फिरायला भरपूर ; खायला चविष्ट, चटकदार : बालगोपाळांसह सर्वांना मज्जाच मज्जा...

खेळायला, फिरायला भरपूर ; खायला चविष्ट, चटकदार : बालगोपाळांसह सर्वांना मज्जाच मज्जा : अटल महोत्सव

ताजी बातमी /ऑनलाईन टीम
इचलकरंजीत अटल महोत्सव सुरू होऊन अगदी काहीच दिवस झाले आहेत मात्र या महोत्सवाची चर्चा संपूर्ण शहर व परिसरात अत्यंत जोरदार सुरू आहे. या महोत्सवाबद्दल वाटणाऱ्या प्रतिक्रिया शहर व परिसरातील अनेक नागरिकांनी आज ताजी बातमीकडे नोंदवल्या. यातील काही निवडक प्रतिक्रिया खालील प्रमाणे…
इचलकरंजी नामदेव भवन परिसरात भरलेल्या महोत्सवाबद्दल मला खूप हेवा वाटतो. गेल्या वर्षीपासून पाहतोय या महोत्सवात अनेकांना आनंद द्विगुणित करता येतोय. आमच्यासारखे सर्वसामान्य भरपूर मनमुराद आनंद लुटत आहोत. आणि येथे सर्व काही अगदी 20,30,40 रुपयांना उपलब्ध असल्याने आम्हा घरच्या सर्व मंडळींना येथे असणारे सर्व काही भरपूर प्रमाणात उपभोक्ता येत आहे.
– सचिन चौगुले, आदिनाथ सोसायटी इचलकरंजी
प्रथम मी अटल महोत्सव आयोजित करणाऱ्यांचे आभार मानतो. कारण असा आनंद मिळवून देण्यासाठी तसेच वर्षभराचा विरंगुळा दूर करून आम्हाला पुन्हा उत्साही बनवणारा हा अटल महोत्सव आहे. हा महोत्सव सुरू झाल्यापासून मी स्वतः व माझ्या मित्रपरिवारासह दररोज येथे भेट देत आहोत. आम्हाला दररोज खूप छान वाटत आहे.
– उत्तम शेळके, कोल्हापूर नाका इचलकरंजी
अटल महोत्सवात आल्यानंतर खरंच कोणत्यातरी मोठ्या मेट्रो सिटी मध्ये जाऊन जरा हटके लाईफस्टाईल जगल्यासारखं वाटतं. कारण येथे येणाऱ्या प्रत्येकाचा जोश आणि जल्लोष खूप मोठा दिसून येतो. मी, माझे पती मुलामुलांसह सासू-सासरे असे सर्वजण या महोत्सवाचा लाभ घेत आहोत. खूपच आनंददायी क्षण येथे पाहायला मिळतात.
– सौ सुजाता काळे, सांगली रोड इचलकरंजी.
आम्ही आमच्या ग्रुपच्या सर्व मैत्रिणी दररोज इकडे भेट देत असून येथे असणाऱ्या अनेक चविष्ट पदार्थ खाणे तसेच संध्याकाळी खूप फिरणे, यासह चेष्टा मस्करी करत महोत्सव सुरू झाल्यापासून दररोज येथे येत आहोत. असं वाटतंय हा महोत्सव कायमच सुरू राहावा.
– कु. सोनल कुलकर्णी, चंदुर रोड इचलकरंजी.
अटल महोत्सवात पहिल्यांदाच नातवाला घेऊन गेलो. तिथे असणाऱ्या विविध खेळ खेळताना तो खूप आनंदी दिसून आला. त्याचा तो आनंद आणि तो चेहरा माझ्या हृदयात कायमचा जणू दडूनच गेला आहे. अशा अनेक लहान मुलांसह सर्वांनाच आनंद दायी क्षण या अटल महोत्सवात मला पाहायला मिळाले. हा महोत्सव आयोजित करणाऱ्यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. आणि त्यांनी सातत्याने हा उपक्रम सुरू ठेवावा अशी विनंती देखील करतो.
– तात्यासाहेब बेलेकर, ज्येष्ठ नागरिक, कबनूर
RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -