Thursday, September 19, 2024
Homeदेश विदेशकमाईच्या बाबतीत या छोट्या देशाने सगळ्या देशांना पाजलं पाणी, नाव ऐकून हैराण...

कमाईच्या बाबतीत या छोट्या देशाने सगळ्या देशांना पाजलं पाणी, नाव ऐकून हैराण व्हाल

जगात कमाईच्या बाबतीत सर्वात पुढे असलेला देश कोणता असा प्रश्न विचारला तर तुम्हाला वाटेल की, या यादीत अमेरिका किंवा ब्रिटन हा देश पुढे असेल असे तुम्हाला वाटलं असेल. पण तसं नाहीये. कारण या यादीत कझाकिस्तान सर्वात पुढे आहे. कझाकिस्तान हा एक छोट्याशा देश आहे. पण गेल्या 13 वर्षांपासून तो पैसे कमावण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे. 2010 पासून अमेरिका, ब्रिटन, भारत आणि चीनपेक्षा जास्त संपत्ती या देशाने कमवली आहे. याचे कारण तेल आणि युरेनियम यांसारख्या नैसर्गिक संसाधनांचे अफाट साठे या देशात आहे. व्हिज्युअल कॅपिटलिस्टच्या अहवालानुसार, 2010 पासून कझाकिस्तानने आपली संपत्ती 190 टक्क्यांनी वाढवली आहे. ही जगातील सर्वोच्च कमाई आहे. चीनसारख्या मोठ्या देशाने या काळात केवळ 185 टक्के संपत्ती वाढवली आहे.

 

कझाकिस्तान हा मध्य आशियातील देश आहे. या देशात तेल आणि युरेनियम यांसारख्या नैसर्गिक संसाधनांचा प्रचंड मोठा साठा आहे. या संसाधनांमुळे, कझाकिस्तानची अर्थव्यवस्था खूप वेगाने विकसित झाली आहे. कझाकिस्तानने गेल्या 13 वर्षांत इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त संपत्ती मिळवली आहे.

 

भारताने किती संपत्ती वाढवली?

कतारसारख्या इतर देशांनीही आपली संपत्ती वाढवली आहे. कतारने 2010 पासून आपली संपत्ती 157 टक्क्यांनी वाढवली असून ते तिसऱ्या क्रमांकावर आहे. या कालावधीत भारताने आपली संपत्ती 133 टक्क्यांनी वाढवली असून तो सातव्या क्रमांकावर आहे.

 

कझाकिस्तान हा जगातील सर्वात मोठा किंवा प्रसिद्ध देश नसला तरी त्याच्या नैसर्गिक साधनसंपत्तीमुळे तो जगातील सर्वात श्रीमंत देश बनला आहे. आर्थिक यशासाठी आकार आणि लोकसंख्या याचा काही फरक पडत नाही. कझाकिस्तान क्षेत्रफळानुसार जगातील नवव्या क्रमांकाचा देश आहे. हा देश आशिया खंडात आहे. तो पूर्वी सोव्हिएत युनियनचा एक भाग होता. 1991 मध्ये सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्यानंतर कझाकिस्तान स्वतंत्र झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -