Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रबेवारस बॅग तपासताना झालेल्या स्फोटात एक जण जखमी

बेवारस बॅग तपासताना झालेल्या स्फोटात एक जण जखमी

कोलकाता येथे एका बेवारस बॅगेत ठेवलेल्या स्फोटकात स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या बेवारस बॅगेची तपासणी करीत असताना अचानक बॅगेतील स्फोटकांचा ब्लास्ट होऊन एक जण गंभीर झाला आहे. त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस करीत आहेत. जखमी व्यक्तीची प्रकृती स्थिर असून या व्यक्तीला एनआरसी रुग्णालयात दाखल केले आहे.

 

पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे रस्त्यावर पडलेल्या बेवारस बॅगेला उचलायला गेलेल्या व्यक्ती बॅगेतील स्फोटकांच्या ब्लास्टमुळे जखमी झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी घटना स्थळी तपास सुरु केला आहे. या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी नव्हती. परंतू कोलकाता येथे गेल्या काही दिवसातील घडामोडीमुळे पोलिसांना या प्रकरणाचा सखोल तपास सुरु केला आहे. रस्त्याच्या कडेला एक बॅग पडली होती. या बॅगेत काय आहे हे पाहण्यासाठी एका पादचाऱ्याने ती बॅग उचलली असता या बॅगेत ठेवलेल्या स्फोटकांचा अचानक स्फोट झाल्याने ही व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. शनिवारी दुपारी 01.45 हा स्फोट झाला. तलतला पोलिस ठाण्याला या संशयास्पद बॅगे संदर्भात फोन वरुन तक्रार आली होती. बॅगेची तपासणी करताना या बॅगेचा स्फोट झाला. ब्लोच मॅन सेंट आणि एसएन बनर्जी रोडवर ही घटना घडली आहे. रोडवर एका प्लास्टीक बॅग पडली होती. तेथून जाणाऱ्या एका पादचाऱ्याने उत्सुकते पोटी ही बॅग उचलली आणि त्याचा स्फोट झाला.

 

संपूर्ण परिसराची नाकाबंदी तपास सुरु

स्फोटाची घटना होताच संपूर्ण परिसराची नाकाबंदी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास केला जात आहे. बॉम्ब शोधक आणि नाशक पथक घटनास्थळी रवाना झाले असून अधिकारी या घटनास्थळाची आणि स्फोटकासाठी नेमके काय वापरण्यात आले याचा तपास करीत आहेत. या स्फोटात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव बापी दास ( 58 ) असल्याचे सांगितले जात आङे. त्याच्याकडे कोणताही रोजगार नसल्याने तो रस्त्यावर भटकत असतो. तो अलिकडे येथील फूटपाथवर राहायला लागला होता.अद्याप ही या व्यक्तीचा जबाब नोंदवलेला नाही.त्याची प्रकृती बरी नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. या स्फोटाची फोरेन्सिक तपासणी केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -