Thursday, November 14, 2024
Homeमहाराष्ट्रगणेशोत्सव संपला तरी आनंदाचा शिधा मिळेना! लाभार्थ्यांची तक्रार; अपूर्ण संच आल्याने नागरिक...

गणेशोत्सव संपला तरी आनंदाचा शिधा मिळेना! लाभार्थ्यांची तक्रार; अपूर्ण संच आल्याने नागरिक योजनेपासून वंचित

जिल्ह्यात एकूण आठ लाख ५४ हजार ६५८ लाभार्थ्यांना शंभर रुपयांत आनंदाचा शिधा वाटप केला जातो. सण-उत्सवांच्या काळात जनतेचा आनंद द्विगुणित करण्यासाठी राज्य सरकारने १०० रुपयांत आनंदाचा शिधा ही योजना सुरू केली. यात एक किलो रवा, हरभराडाळ, साखर व एक लिटर सोयाबीन तेल दिले जाते.

 

चालू वर्षी आनंदाच्या शिध्यात बदल झाला आहे. एक किलो मैदा व एक किलो पोहे रद्द करून सरकारने रवा व तेल वाढविले. त्यामुळे आनंदाचा शिधा गरिबांसाठी महत्त्वपूर्ण ठरतो. त्याचे लाभार्थीही निश्चित झाले आहेत. जिल्हा पुरवठा विभाग त्या प्रमाणात राज्य शासनाकडे मागणी करते.

 

जिल्ह्यातील एकूण साडेआठ लाख लाभार्थ्यांमध्ये अंत्योदय योजनेचे एक लाख ७६ हजार १८ लाभार्थी आहेत; तर प्राधान्य कुटुंबचे सहा लाख ७८ हजार ६४० लाभार्थी आहेत. या दोन्ही गटांतील लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा दिला जातो. सोबत एक कापडी पिशवीही मिळते.

 

गणेशोत्सव काळात आनंदाचा शिधा वाटपाच्या वस्तू अपूर्ण प्रमाणात आल्याने ठराविक तालुक्यांतच त्याचे वाटप झाले. आता गणेशोत्सव संपला, तरी आनंदाचा शिधा काही लोकांना मिळालेला नाही. गणेशोत्सव संपल्यावर तरी हा शिधा मिळेल की नाही, याविषयी त्यांच्या मनात साशंकता निर्माण झाली आहे.

 

“गणेशोत्सव काळात आनंदाचा शिधा मिळण्याची अपेक्षा होती. पण, अजूनही शिधा मिळालेला नाही. चौकशी केली तर एक-दोन दिवसांत मिळेल, असे म्हणतात. पण, अनंत चतुर्दशीनंतर वाटप होईल का?”- सोमनाथ गांगुर्डे, लाभार्थी

 

“आनंदाचा शिधा संचाचा पुरवठा करण्यात आला आहे. चुकीने काही लाभार्थी राहिले असतील, तर त्यांची चौकशी केली जाईल.” – कैलास पवार, प्र. जिल्हा पुरवठा अधिकारी

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -