Friday, November 22, 2024
Homeइचलकरंजीइचलकरंजी : झिम्मा फुगडी स्पर्धेत श्रध्दा ग्रुप महिला मंडळ अव्वल जय...

इचलकरंजी : झिम्मा फुगडी स्पर्धेत श्रध्दा ग्रुप महिला मंडळ अव्वल जय जिजाऊ द्वितीय तर मैत्री ग्रुप महिला मंडळ तृतीय

इचलकरंजी

भारतीय संस्कृती जपण्यासाठी व महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी इचलकरंजी फेस्टिव्हल अंतर्गत आयोजित झिम्मा फुगडी स्पर्धेमध्ये श्रद्धा ग्रुप महिला मंडळ (ज्वल) या ग्रुपने प्रथम क्रमांक पटकविला. यावेळी लकी ड्रॉ च्या माध्यमातून दोन महिलांना चांदीचे नाणे बक्षिस देण्यात आले. दरम्यान, सायंकाळच्या सत्रात प्रसिध्द जादूगर जितेंद्र रघुवीर यांच्या विविध जादूचा कार्यक्रम पार पडला. त्याला बच्चे कंपनीचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

स्पर्धेत इचलकरंजी, कोल्हापूर, सांगली, सातारा परिसरातील जवळपास 20 पेक्षा अधिक महिला ग्रुपनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये जय जिजाऊ महिला मंडळ (इचलकरंजी) ने द्वितीय तर मैत्री ग्रुप महिला मंडळ (इचलकरंजी) ने तृतीय आणि ताराराणी ग्रुप महिला मंडळ (कोल्हापूर) ने चतुर्थ क्रमांक मिळविला. तर मानिनी ग्रुप महिला मंडळ कोरोची यांना उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात आले.

फेस्टिव्हलच्या संयोजिका सौ. मौश्मी आवाडे यांनी, आपण कितीही आधुनिक बनलो तरी आपल्याला आपली संस्कृती नजरेआड करता येणार नाही.चप्रत्येक सण, उत्सव साजरे करताना आपण पारंपरिकता व संस्कृतीचे जतन करीत असतो. स्पर्धेत सहभागी झालेल्या शहरी आणि ग्रामीण भागातील महिलानी आपल्या मराठमोळ्या संस्कृतीचे उत्तम दर्शन घडवले. ग्रामीण भागातील महिलांचे सादरीकरण तर थक्क करणारे होते. स्पर्धेला उत्सवाचे स्वरूप आले. आपल्या संस्कृतीचा हा अनमोल ठेवा अखंड जपण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे सांगितले.

सर्व विजेते व स्पर्धकांना इचलकरंजी फेस्टिव्हलच्या संयोजिका सौ. मौश्मी आवाडे यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. स्पर्धेसाठी अनु बोरवणकर, साधना माळी, प्रफुलता बिडकर यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. याप्रसंगी फेस्टिव्हलचे कार्यवाह अहमद मुजावर, सचिव चंद्रशेखर शहा, द्राक्षायणी पाटील, मधु शिंदे, सानिका आवाडे, उर्मिला गायकवाड, लक्ष्मी सपाटे, नजमा शेख, सोनाली तारदाळे, गिरीजा हेरवाडे, मेघा भाटले, शितल सूर्यवंशी, सपना भिसे, सीमा कमते, अंजुम मुल्ला, मंगला सुर्वे, सुनिता आडके, स्वाती काडाप्पा यांच्यासह स्पर्धक महिला व प्रेक्षक उपस्थित होते.

सायंकाळी प्रसिध्द जादूगर जितेंद्र रघुवीर यांचे जादूचे प्रयोग पार पडले. त्यांनी सादर केलेल्या जादूच्या प्रयोगामुळे उपस्थित रसिकांसह बच्चे कंपनीने चांगलीच धमाल केली. प्रत्येक जादूला बच्चे कंपनीकडून दाद मिळाली. एकापेक्षा एक जादूच्या प्रयोगामुळे उपस्थित रसिकांना चांगलेच खिळवून टाकले. या कार्यक्रमाची सुरुवात इचलकरंजी शहरातील पत्रकारांच्या हस्ते श्रींची महाआरती करुन करण्यात आला. यावेळी अजय उर्फ आबा जाधव, पंडीत कोंडेकर, अरुण काशिद, धर्मराज जाधव, हुसेन कलावंत, सुनिल मनोळे, फिरोज शेख, विकी खांडेकर, कृष्णात लिपारे आदी उपस्थि

त होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -