Saturday, November 23, 2024
Homenewsगरिबांच्या धान्यावर लुटारूंचा डोळा, राज्यात रेशन माफियांचा धुमाकूळ

गरिबांच्या धान्यावर लुटारूंचा डोळा, राज्यात रेशन माफियांचा धुमाकूळ


गोरगरीब जनतेला स्वस्त दरात धान्य मिळावं यासाठी शासनामार्फत रेशनिंग दुकानांमधून स्वस्त धान्याचं वाटप केलं जातं. ग्राहक हे स्वस्त धान्य घरी घेऊन नेतात खरं, पण हे धान्य त्यांच्या ताटात जाण्याऐवजी दुसरीकडेच जातं. कारण या धान्याचा राजरोसपणे काळाबाजार सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. झी 24 तासच्या टीमनं या काळ्या कृत्याचं स्टींग ऑपरेशन केलं आहे.


औरंगाबादमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आलं आहे. धान्य माफिया चाळींमध्ये, झोपडपट्टीत फिरत असतात. तिथल्या लोकांनी मोफत किंवा दोन रूपये किलोनं घेतलेलं धान्य ते 9 ते 12 रूपये दरानं विकत घेतात.


ही लोक दुकानातून धान्य वितरीत झालं की लक्ष ठेवतात आणि नंतर त्या कॉलनीत जावून लोकांना पैशांचं आमिष दाखवून ते धान्य विकतं घेतात, अनेकांना तर या माफियांनीच रेशन कार्ड सुद्धा बनवून दिले आहे, आणि नंतर त्यांच्याकडून ते धान्य विकत घेतात. आणि हा सगळा प्रकार बिनधास्त सुरु आहे,
हे धान्य माफिया लोकांच्या गरिबीचा फायदा घेत त्यांना धान्य विकण्यास प्रवृत्त करत आहेत. इतकच नव्हे तर जास्तीत जास्त लोकांना धान्य विक्री करायला सांगा असाही आग्रह हे माफिया करतात.


लुटीचा हा गोरखधंदा रेशन दुकानदारांच्याही लक्षात आला आहे. पण आपण काहीच करू शकत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. कारण हा प्रकार कुठल्याच कायद्याच्या चौकटीत येत नाही.


विकत घेतलेलं धान्य कुठे जातं?
हे धान्य कुठं जातं याचा शोध घेण्याचा प्रयत्न झी 24 तासच्या टीमनं केला. तेव्हा आणखी एक धक्कादायक माहिती पुढं आली. यातलं काही धान्य पॉलिश करून त्याची चढ्या दरानं विक्री केली जाते. तर काही धान्य इडली, डोसा पीठ विकणाऱ्या कंपन्यांना दिलं जातं. जे धान्य खराब असेल त्याची पोल्ट्री फार्मवाल्यांना विक्री केली जाते. देशात कुणीही उपाशी राहू नये म्हणून शासन मोफत किंवा स्वस्त दरात धान्य देतं. मात्र याच धान्याचा काळाबाजार सर्रास आहे.
हा प्रकार रोखण्यासाठी अशा रेशन माफियांवर कडक कारवाई होण्याची गरज आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -