Wednesday, March 12, 2025
Homeमहाराष्ट्रलाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सप्टेंबर महिन्याचे पैसे या तारखेला होणार जमा

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सप्टेंबर महिन्याचे पैसे या तारखेला होणार जमा

राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळणार आहे. या योजनेत जुलै महिन्यापासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

 

अनेक महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे आले आहे.

 

जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून ३००० रुपये महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. या योजनेत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे. आता महिला सप्टेंबर महिना अखेरपर्यंत अर्ज करु शकणार आहेत.

 

जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा झाल्यानंतर आता लाडक्या बहि‍णींचे लक्ष तिसऱ्या हप्त्याकडे आहे. महिलांना आता सप्टेंबर महिन्यात कधी पैसे येणार याबाबत महिलांना अनेक प्रश्न पडले आहेत.

 

ज्या महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे ३००० रुपये जमा झाले आहे. त्यांच्या खात्यात आता १५०० रुपये जमा होणार आहे. ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज केला आहे. त्यांना तीन महिन्याचे ४५०० रुपये मिळणार आहे. हा हप्ता कधी येणार याकडे लाडक्या बहि‍णींचे लक्ष आहे.

 

या तारखेला येऊ शकतात लाडकी बहीण योजनेचे पैसे

 

मीडिया रिपोर्टनुसार, १६ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या कालावधीत महिलांच्या अकाउंटला पैसे जमा होणार शकतात. याबाबत अजूनही कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु या महिन्यात पैसे जमा होणार आहेत, असं सांगण्यात आलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -