Saturday, October 12, 2024
Homeनोकरीटीसीएस 40, इन्फोसिस 20 तर विप्रो 10 हजार फ्रेशर्सना जॉब देणार, आयटी...

टीसीएस 40, इन्फोसिस 20 तर विप्रो 10 हजार फ्रेशर्सना जॉब देणार, आयटी कंपन्यांत नोकरीची तरुणांना पुन्हा संधी!

गेल्या काही दिवसांपासून भारतासह जगभरात आयटी क्षेत्रातून चिंता वाढवणाऱ्या बातम्या येत होत्या. आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांनी भरती प्रक्रिया थांबवलेली होती. तसेच अनेकांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. अशा स्थितीत आयटी क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्यांची स्थिती चांगलीच वाईट झाली होती. आता मात्र आयटी कंपन्यांनी पुन्हा एकदा तरुणांसाठी आपले दरवाजे खुले केले आहेत. भारतातील आयटी कंपन्या लवकरच फ्रेशर्सना नोकरीच संधी देणार आहेत. आयटी कंपन्यांकडून आता कॅम्पस इन्टरव्ह्यू घेण्यास सुरुवात केली जाणार आहे. यावेळी आयटी कंपन्या क्लाऊड कॉम्यूटिंग, टेडा आणि एआय या क्षेत्रात ज्ञान असणाऱ्यांना संधी देणार आहेत.

 

आयटी कंपन्या कॅम्पस इन्टव्ह्यू राबवणार

आयटी क्षेत्रातील कंपन्यांकडून राबवल्या जाणाऱ्या या भरती प्रक्रियेविषयी बिझनेस टुडेने वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार सध्या आयबीएम (IBM), इन्फोसिस (Infosys), टीसीएस (TCS) आणि एलटीआयमाइंडट्री (LTIMindtree) या कंपन्यां लवकरच कॅम्पस इंटरव्ह्यू घेणार आहेत. त्यासाठी या कंपन्यांकडून कॉलेजेसना भेट दिली जात आहे. यावेळी मात्र निवड प्रक्रिया वेगळ्या पद्धतीने राबवली जाणार आहे.

 

आयटी क्षेत्रात नावाजलेल्या कंपन्या यावेळी मात्र काही निवडक तरुणांनाच नोकरीची संधी देणार आहेत. यावेळी प्रामुख्याने क्लाउड कंप्यूटिंग (Cloud Computing), डेटा अॅनालिटिक्स (Data Analytics) आणि कृत्रिम बुद्धीमत्तेची (Artificial Intelligence) माहिती असणाऱ्यांना नोकरी दिली जाऊ शकते. त्यासाठी तरुण-तरुणींना 6 ते 9 लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज दिले जाऊ शकते.

 

ऑफ कॅम्पस जॉयनिंगही वाढणार

आगामी वर्षाच्या जुलै महिन्यापासून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणार आहेत. यासह अनेकांना ऑफ कॅम्पसच्या माध्यमातूनही नोकरी दिली जाणार आहे. यामध्ये टीसीएस कंपनीकडून 40 हजार, इन्फोसिस कंपनीकडून 20 हजार तर विप्रो (Wipro) या कंपनीकडून 10 हजार फ्रेशर्सना नोकरीवर घेतले जाणार आहे. त्यासाठी या कंपन्यांकडून तयारी केली जात आहे. विप्रो कंपनीत होणाऱ्या भरतीबाबत एचआर हेड सौरभ गोविल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका वर्षानंतर आता आम्ही पुन्हा एकदा कॅम्पस हायरिंग चालू करणार आहोत, असे त्यांनी सांगितले. यावेळी कॅम्पस हायरिंग करताना गुणांची किमान मर्यादा ही 60 टक्क्यांहून 70 टक्के होऊ शकते.

 

स्कील तसेच सोशल मीडियावर राहणार नजर

यावेळच्या कॅम्पस हायरिंगमवेघील शिक्षण, कौशल्य यासोबतच समाजमाध्यम खात्यावरही या कंपन्यांची नजर असणार आहे. उमेदवाराची संपूर्ण माहिती घेण्याचा यामागे प्रयत्न असणार आहे. त्यामुळे आयटी क्षेत्रआत करिअर करू इच्छीनाऱ्यांसाठी यावेळी कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून नोकरी मिळवण्याची उत्तम सधी आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -