Friday, October 18, 2024

दमदार स्टारकास्ट, पुरेपूर मनोरंजन करणाऱ्या ‘नवरा माझा नवसाचा 2’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी दमदार प्रतिसाद दिला आहे. ‘नवरा माझा नवसाचा 2’ या चित्रपटाला पहिल्या दिवशी मिळालेला प्रतिसाद हा मराठी चित्रपटांच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या ओपनिंगपैकी एक आहे. एक हजारपेक्षा अधिक शोजने सुरुवात केलेल्या या चित्रपटाचे 600 पेक्षाही अधिक शोज हाऊसफुल्ल होते. पहिल्या वीकेंडला या सीक्वेलने दमदार कमाई केली.

 

20 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘नवरा माझा नवसाचा 2’ या चित्रपटाला गणपती बाप्पाच पावला असं म्हणायला हरकत नाही. पहिल्या वीकेंडला या चित्रपटाने 7.84 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या ‘नवरा माझा नवसाचा 2’ या चित्रपटाची निर्मिती, कथा – पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केलंय. यात अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे यांच्यासह मोठी स्टारकास्ट आहे.

 

नवस फेडण्यासाठी जातानाचा रेल्वे प्रवास, त्यात होणाऱ्या गमतीजमती हा चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे. सोनू निगम, जॉनी लिवर, श्रिया पिळगांवकर हे पाहुण्या कलाकराच्या भूमिकेत असून प्रेक्षकांना हे सरप्राइज पसंतीस पडले आहेत. बऱ्याच दिवसांपासून रसिक प्रेक्षकांमध्ये ‘नवरा माझा नवसाचा 2’हा चित्रपट चर्चेत राहिला आणि त्याचंच प्रतिबिंब बॉक्स ऑफिसवरही उमटत आहे.

‘नवरा माझा नवसाचा 2’मध्ये स्वप्नील जोशी-हेमल इंगळे ही जोडी सचिन-सुप्रिया पिळगांवकर यांची जावई, मुलगी अशा भूमिकेत दिसली आहे. सासऱ्यांनी ज्याप्रमाणे धडपड करून नवस फेडला, तसा आता जावयाला फेडता येतो का? याची धमाल गोष्ट या चित्रपटात पहायला मिळत आहे. नवस फेडण्यासाठीच्या रेल्वे प्रवासात हिरे चोरीच्या गुन्ह्याच्या तपासाचं कथानकही उलगडणार आहे. त्यामुळे मनोरंजक आणि थरारक अनुभव प्रेक्षकांना या चित्रपटातून मिळत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -