Sunday, December 22, 2024
Homeमनोरंजनबिग बॉस मराठी’च्या घरात रंगणार नवा खेळ; स्पर्धकांच्या चेहऱ्यांवर लागणार रंग

बिग बॉस मराठी’च्या घरात रंगणार नवा खेळ; स्पर्धकांच्या चेहऱ्यांवर लागणार रंग

‘बिग बॉस मराठी’ चा हा सिझन सतत चर्चेत असतो. या सिझनमधील टास्कही चर्चेत असतात. ‘बिग बॉस मराठी’ हा छोट्या पडद्यावरील लयभारी खेळ प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. दिवसेंदिवस प्रेक्षकांमध्ये या कार्यक्रमाची चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. प्रत्येक आठवड्याला घरात नवा टास्क पार पडत असतो. आताही ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नवा खेळ पाहायला मिळणार आहे. यात कोण सांगकाम्य ठरणार अन् कोण मालक? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तर ‘टॉप 5’ वरून डीपी आणि निक्कीमध्ये संभाषण झालं आहे. तर अभिजीतच्या मनात मात्र एक खंत आहे. तो ती बोलून दाखवतो.

 

‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो समोर आला आहे. यात बिग बॉसने स्पर्धकांशी संवाद साधत आहेत. या आठवड्यात आपल्यातील काही सदस्य ठरतील सांगकामे आणि उर्वरीत सदस्य ठरतील त्यांचे मालक. मालकांनी सांगितलेली त्यांची वैयक्तिक कामेसुद्धा त्यांना करावी लागतील, असं बिग बॉस सांगतात. या टास्कमुळे आज घरात रंगत येणार आहे. कोण कोणाला काय कामे देणार याकडे प्रेक्षकांचं आता लक्ष लागलं आहे.

 

डीपी आणि निक्कीचा संवाद

‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात निक्की, अभिजीत, डीपी आणि अंकिता एकमेकांसोबत चर्चा करताना दिसणार आहे. तिकीट टू फिनाले म्हणजे काय टॉप 5, असं निक्की म्हणते. त्यावर डीपी तिला उत्तर देतो. मी तुला टॉप 5 मध्ये पाहतोय, असं तो म्हणतो. त्यावर माझं तुम्हाला सांगणं हे कर्तव्य आहे, असं निक्की म्हणते. जसं तुला वाटतंय ना हा व्यक्ती घरात करतोय काय? कशासाठी आलाय, असं म्हणत डीपी तिला उत्तर देतो. मी तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करतेय तुम्ही काल माझं तिकीट टू फिनाले काढलं…पण त्यासाठी तुम्ही दिलेलं कारण हीच माझी समस्या आहे, असं निक्की त्याला म्हणते.

 

‘बिग बॉस मराठी’चा महाअंतिम सोहळा येत्या 6 ऑक्टोबरला पार पडणार आहे. त्यामुळे सदस्यांमध्ये मानाची ट्रॉफी पटकावण्यासाठी आजपासून चांगलीच लढत पाहायला मिळणार आहे. आपल्या खेळाबद्दल सदस्य एकमेकांसोबत चर्चा करताना दिसणार आहेत.

अभिजीत आणि पॅडीमध्ये बोलणं होतं. अभिजीत त्याची नाराजी बोलून दाखवतो. ज्यावेळी भांडणं होत होती त्यावेळी तुम्ही माझ्या बाजुने कधी बोलला नाहीत. तुमच्यासोबत उभं राहिलं पाहिजे असं मी बोललो होतो. पण आता माझं कोणासोबत भांडण होईल तेव्हा मला हेच सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या लोकांसाठी उभं राहा. त्याची साथ सोडू नका, असं अभिजीत पॅडीला म्हणतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -