Friday, June 21, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर जिल्ह्यात ३४ हजारांवर मतदार वाढणार

कोल्हापूर जिल्ह्यात ३४ हजारांवर मतदार वाढणार

new voter जिल्ह्यात 34 हजारांवर मतदार वाढणार आहेत. दि. 1 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यात राबविलेल्या मतदारयादी संक्षिप्त पुननिरीक्षण कार्यक्रमांतर्गत नव्याने मतदार नोंदणीसाठी 47 हजार 209 अर्ज दाखल झाले. मतदारयादीतून नाव वगळण्यासाठी 12 हजार 921 अर्ज दाखल झाले आहेत. यासह यादीतील दुरुस्ती, मतदारसंघातील पत्ता बदलणे असे एकूण सर्व 69 हजार 313 अर्ज आले आहेत.

भारत निवडणूक आयोगाकडून मतदारयादी संक्षिप्त पुननिरीक्षण कार्यक्रम दरवर्षी राबविण्यात येतो. यावर्षी 1 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत हा कार्यक्रम झाला. याअंतर्गत 1 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण होणार्‍यांना नवमतदार म्हणून नावनोंदणी करता येते. यासह मतदारयादीत नोंद नसल्यास मतदार नोंदणी, मतदारयादीतील तपशिलात चुका असतील अथवा बदल करायचा असेल, मृत्यू, स्थलांतर अथवा दुबार या कारणास्तव मतदारयादीतील नाव वगळणे आणि एकाच मतदारसंघात पत्ता बदलण्यासाठी अर्ज सादर करता येतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -