Sunday, September 24, 2023
Homeसांगलीसांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या शून्यावर

सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या शून्यावर

सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या शनिवारी शून्यावर आली; परंतु परदेशातून आलेल्या-गेलेल्यांचे रिपोर्ट रविवारी येणार आहेत. तसेच कर्नाटक सीमाभागातून नागरिकांची ये-जा सुरू असल्याने जिल्ह्यात ओमायक्रॉनचा शिरकाव होण्याची धास्ती कायम आहे.

आज मात्र ही रुग्णसंख्या शून्यावर आली. आज 579 जणांची आरटीपीसीआर व 741 जणांची अ‍ॅन्टिजन टेस्ट करण्यात आली; पण जिल्ह्यातील कोणत्याच तालुक्यात एकही रुग्ण आज मिळाला नाही. त्यामुळे जिल्ह्याला थोडासा दिलासा मिळाला आहे; परंतु ओमायक्रॉन हा नवीन व्हेरिएंटचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण जिल्ह्यात 127 जण परदेशांतून आले होते. यातील बहुतांशजण परत गेले आहेत. काहीजण पुणे, मुंबईत आहेत. या सर्वांची तपासणी करण्यात आली आहे. यातील 25 जणांचे रिर्पोट निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित जणांचे रिर्पोट रविवार, दि. 5 रोजी येणार आहेत. विमानतळावरून काटेकोर तपासणी झाली आल्याने बहुतांश जणांचे अहवाल निगेटिव्ह येण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र