- एक भीषण अपघात झाला आहे. बुधवारी सकाळी ही दुर्घटना घडली. मागून प्रचंड वेगात आलेली कार पुढे जाणाऱ्या ट्रकला धडकली. अपघाताच्यावेळी कारचा स्पीड इतका होता की, अर्धी कार ट्रकमध्ये घुसली. या अपघातात कारमध्ये बसलेल्या 7 जणांचा जागीच मृत्यू झाला. एक व्यक्ती गंभीर जखमी झालाय. गुजरातच्या साबरकांठा जिल्ह्यात हा भीषण अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी एका जखमीला रुग्णालयात हलवलं. त्याची प्रकृती नाजूक आहे. कार चालकाचा डोळा लागल्याने हा अपघात झाल्याची शक्यता आहे. सध्या पोलीस या अपघाताची चौकशी करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमध्ये एकूण 8 जण होते. शामलाजी येथून ते सर्व अहमदाबादला चाललेले. पोलिसांनी जखमी आणि मृतांची ओळख पटवून त्यांच्या कुटुंबियांना माहिती दिली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पहाटे 4.30 च्या सुमारास हा भीषण अपघात झाला. या अपघातात कारच चेंदामेंदा झाला आहे. अपघाताच्या वेळी कारचा स्पीड अंदाजे 120 किमी प्रतितास असण्याची शक्यता आहे.
कारचा पुढचा भाग ट्रकमध्ये घुसला. पोलीस आणि फायर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कारचा पत्रा कापून मृतदेह बाहेर काढले. साबरकांठाचे एसपी विजय पटेल यांच्यानुसार, माहिती मिळताच पोलीस टीम घटनास्थळी पाठवण्यात आली होती. पोलिसांनी लगेच जखमीला रुग्णालयात हलवलं. गाडीमधून मृतदेह काढल्यानंतर शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. जखमी आणि मृतांची ओळख पटली आहे. कार चालकाची झोप हे अपघातामागच कारण असू शकतं, असं पोलीस अधिकारी म्हणाले. अपघाताच्यावेळी ट्रकचा स्पीड सामान्य होता, असं पोलीस म्हणाले.