Saturday, December 21, 2024
Homeब्रेकिंगसोने आणि चांदीची गरूड भरारी; आता काय किंमती? मौल्यवान धातूत स्वस्ताई कधी?

सोने आणि चांदीची गरूड भरारी; आता काय किंमती? मौल्यवान धातूत स्वस्ताई कधी?

सोने आणि चांदीच्या किंमतीत दरवाढीचे सत्र सुरूच आहे. मौल्यवान धातुत दिवसागणिक वाढ होत आहे. गेल्या आठवड्यात ही दोन्ही धातूंनी मोठी उसळी घेतली होती. तर या आठवड्यात सलग दरवाढीमुळे सणासुदीत ग्राहकांचा खिसा कापल्या जाणार हे स्पष्ट आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात भाववाढ झाल्याने मौल्यवान धातुत स्वस्ताई येण्याची कमी चिन्ह आहेत. बाजारातील तज्ज्ञानुसार आता सणांच्या हंगामात आणि तुळशी विवाहानंतर लग्नसराई येणार असल्याने या धातूत नरमाईची शक्यता कमी आहे. दोन्ही धातू लवकरच सर्वकालीन उच्चांका गाठतील. आता अशा आहेत सोने आणि चांदीची किंमत

दोन आठवड्यात सोन्याने 2,000 रुपयांहून अधिकची मुसंडी मारली आहे. 23 सप्टेंबर रोजी दर 220 रुपये, 24 सप्टेंबर रोजी 210 रुपये तर 25 सप्टेंबरला 660 रुपयांनी किंमती वधारल्या. 26 तारखेला भाव स्थिर होता. 27 सप्टेंबर रोजी 430 रुपयांनी किंमती वधारल्या. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,150 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,600 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीची मोठी खेळी

 

गेल्या दोन आठवड्यात चांदीने 6,000 रुपयांची मुसंडी मारली. 22, 23 आणि 24 सप्टेंबर रोजी किंमतीत वाढ झाली नाही. 25 सप्टेंबर रोजी चांदीत 2,000 रुपयांची वाढ झाली. त्यानंतर विश्रांती घेत 27 सप्टेंबर रोजी या धातूने 1 हजार रुपयांची वाढ नोंदवली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 96,000 रुपये आहे.

 

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

 

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 75,640, 23 कॅरेट 74,337, 22 कॅरेट सोने 69,286 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 56,730 रुपये, 14 कॅरेट सोने 44,249 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 91,448 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

 

पितृपक्षात सोने खरेदीचा मुहूर्त केव्हा?

 

पितृपक्षात सोने आणि चांदी खरेदी वर्ज्य आहे. अर्थात शास्त्रात याविषयीचे स्पष्ट संकेत अथवा नियम नाहीत. पूर्वजांची, पित्रांचे स्मरण होत असल्याने या काळात मोठी खरेदी टाळणे योग्य असे मानण्यात येते. पण पितृ पक्षात अशी एक तिथी आहे, ज्यावेळी सोने आणि चांदी खरेदी शुभ मानण्यात येते. पितृ पक्षाच्या अष्टमी तिथीला मौल्यवान धातूची खरेदी शुभ मानण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. अर्थात शास्त्रात याविषयीचा काय नियम आहे हे समजावून घेऊनच ग्राहकांनी खरेदी करावी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -