Saturday, October 12, 2024
Homeमनोरंजन'नवरा माझा नवसाचा २' चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; ६ दिवसांत केली इतक्या...

‘नवरा माझा नवसाचा २’ चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; ६ दिवसांत केली इतक्या कोटींची कमाई

काही दिवसांपूर्वीच ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाचा सिक्वल चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट देखील प्रेक्षकांची मनं जिंकण्यास यशस्यवी ठरला आहे. या चित्रपटामध्ये अनेक दिग्ग कलाकारांची स्टार कास्ट पाहायला मिळत आहे.

 

‘नवरा माझा नवसाचा २’ हा चित्रपट २० सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसतोय. या चित्रपटामध्ये अभिनेता सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर आणि स्वप्निल जोशी यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.

‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी २ कोटींच्या आसपास कमाई केली होती. प्रेक्षकांकडून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. विकेंड्सला चित्रपट पाहाण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली होती. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी १.५८ कोटी, तर दुसऱ्या दिवशी २.५ कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाने चार दिवसांमध्ये ९.०४ कोटींची कमाई करत ८ कोटींचा बजेट वसूल केला आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन आता ६ दिवस झाले आहेत या चित्रपटाने ६ दिवसांमध्ये ११.०४ कोटी कमाई केली आहे. अभिनेता सचिन पिळगांवकर आणि स्वप्नील जोशी स्टारर ‘नवरा माझा नवसाचा २’ हा चित्रपट २०२४चा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

नवरा माझा नवसाचा २’ने जुना फर्निचर या चित्रपटाला देखील कमाईमध्ये मागे टाकून दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरणार की काय? असा प्रश्न उपस्थित होतो. या चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन पिळगावकर यांनी केले आहे. या चित्रपटांमध्ये माहाराष्ट्रा भूषण पुरस्कृत अशोक सराफ, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, स्वप्निल जोशी, सिद्धार्थ जाधव यासारखे अनेक कलाकारांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -