Saturday, October 12, 2024
Homeदेश विदेशसणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के...

सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट

सणासुदीच्या काळात गावी जाणाऱ्यांची संख्या मोठी असते, त्यामुळे सर्वच प्रवासी वाहतुकींवर मोठा ताण असतो. विमानसेवा असेल, रेल्वे असेल किंवा बस सेवा असेल प्रवाशांची गर्दी ठरलेलीच असते.

मात्र, प्रवाशांच्या याच गर्दीचा फायदा घेत अनेक ट्रॅव्हल्स एजन्सीकडून प्रवास भाड्यात वाढ केली जाते. अनेकदा प्रवाशांना नाहक त्रास देऊन प्रवाशांची आर्थिक लूट केली जाते. मात्र, पेटीएम या भारतातील आघाडीच्‍या पेमेंट्स व आर्थिक सेवा वितरण कंपनीने सणासुदीसाठी खास पेटीएम ट्रॅव्‍हल कार्निवलच्‍या लाँचची घोषणा केली. या ट्रॅव्‍हल कार्निवलदरम्‍यान ट्रॅव्‍हल बुकिंगवर विशेष फेस्टिव्‍ह सूट देण्‍यात येणार आहे.

5 ऑक्‍टोबरपर्यंत वापरकर्ते फ्लाइट्सवर जवळपास 5000 रूपयांची बचत करू शकतात आणि बस बुकिंग्‍जवर 25 टक्‍के सूट म्‍हणजेच जवळपास 500 रूपये बचतीचा आनंद घेऊ शकतात. त्यामुळे, प्रवाशांचा प्रवास सुकर आणि स्वस्तातला होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -