Friday, March 14, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात पावसाचा जोर ओसरला का? वाचा हवामान विभागाने नेमकी काय दिली माहिती

राज्यात पावसाचा जोर ओसरला का? वाचा हवामान विभागाने नेमकी काय दिली माहिती

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुजरात आणि पश्चिम मध्य प्रदेशवर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. गुजरातमधील चक्रीय स्थितीमुळे उत्तर कोकण, ठाणे, पालघरमध्ये हलक्या सरी पडल्या. अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्याचा जोर कमी झाला आहे. बंगालच्या उपसागरात हवामानविषयक कोणतीही प्रणाली सक्रिय नसल्यामुळे बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे राज्याच्या दिशेने येत नाही.

 

हवामानाच्या स्थितीमुळे सध्या पावसाची उघडीप असणार आहे. काही दिवसांपूर्वी पावसाने मुंबईला झोडपले होते. तसेच पुण्यामध्ये देखील पावसाचा जोर होता. पण, आता मान्सूनची परतीची वाट धरली आहे. त्यामुळे सध्या पावसाचा जोर ओरसला आहे. काही दिवसातच पाऊस राज्यातून पूर्णपणे माघारी जाण्याची शक्यता आहे.

देशात कशी असेल पावसाची स्थिती?

 

राज्यात पाऊस ओसरला असला तरी देशातील अनेक भागांमध्ये पावासाचा जोर कायम असेल. पूर्व उत्तर प्रदेश, ईशान्येकडील राज्ये, तामिळनाडू, केरळ आणि दक्षिण कर्नाटकमध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. नेपाळमध्ये पावसाचा कहर सुरु आहे. त्यामुळे बिहारला पुराचा धोका आहे. पुराचा फटका बिहारमधील अनेक जिल्ह्यांना बसला आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -