Sunday, November 3, 2024
Homeब्रेकिंगरेल्वेचा मोठा निर्णय ! महाराष्ट्रातील ‘या’ मार्गावरील वंदे भारत ट्रेन रद्द

रेल्वेचा मोठा निर्णय ! महाराष्ट्रातील ‘या’ मार्गावरील वंदे भारत ट्रेन रद्द

देशभरात अनेक मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्यात आल्या आहेत. एवढेच नाही तर देशभरातून या गाडीला मागणी देखील आहे. खूप आरामदायी आणि विमानांप्रमाणे प्रिमिअम गाडीला प्रवाशांनी उचलून धरले. मात्र देशातील या लक्झरी रेल्वे बाबत एक महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. देशभरातील अनेक मार्गांवर एका मागोमाग एक वंदे भारत ट्रेन सुरू केल्या जात आहेत. मात्र या व्हीआयपी ट्रेनला काही मार्गावर उत्तम प्रतिसाद मिळतोय मात्र काही मार्गावर आहे त्या सीट्स सुद्धा भरता येत नाहीत अशी स्थिती आहे.

देशभरात तोट्यात चालणाऱ्या ट्रेन्स पैकी महाराष्ट्रातील एका ट्रेनचे नाव पुढे आले आहे. नागपूर ते सिकंदराबाद आणि सिकंदराबाद-नागपूर वंदे भारत एक्सप्रेस प्रत्येकी दोन दिवस रद्द करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. नागपूर- सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस 2 आणि 3 ऑक्टोबरला तर सिकंदराबाद- नागपूर वंदे भारत एक्सप्रेस 5 आणि 6 ऑक्टोबरला धावणार नाही. 16 सप्टेबरला सुरू झालेल्या गाडीला 15 दिवसांनी रद्द करण्याची वेळ आली आहे.

 

या गाडीच्या वेळापत्रकाबाबत सांगायचे झाले तर 20 डब्यांची नारंगी वंदे भारत एक्सप्रेस नागपूर-सिकंदराबाद-नागपूर या मार्गावर सुरू झाली आहे. ही गाडी मंगळवार वगळता दररोज आहे. या गाडीला नागपूर ते सिकंदराबादचे अंतर कापण्यासाठी 7 तास 15 मिनिटे लागतील. ही गाडी नागपूरहून पहाटे 5 ला निघते आणि दुपारी सिकंदराबादला 12.15 ला पोहोचते.

 

 

या स्थानकांवर थांबे

130 किलोमीटर प्रतितास वेगाने धावणारी ही गाडी नागपूरहून निघाल्यानंतर सेवाग्राम, चंद्रपूर, बल्लारशाह, रामागुंडम आणि काझीपेठ स्थानकांवर थांबते. त्यानंतर थेट सिकंदराबादला जाते. वंदे भारत एक्सप्रेस सिकंदराबादहून दुपारी 1 वाजता निघते आणि नागपूरला रात्री 8.20 वाजता पोहोचते. सध्या नागपूरहून नागपूर -सिकंदराबाद, नागपूर- बिलासपूर आणि नागपूर इंदूर या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहे.

 

11 मार्गावर वंदे भारत तोट्यात

संपूर्ण देशाचा विचार करता जवळपास 66 मार्गावर प्रीमियम ट्रेन सुरू करण्यात आले आहेत परंतु या ट्रेनचा भाडंच एवढं आहे की ही ट्रेन सर्वांना परवडणारी नाही. त्यामुळेच काही मार्ग हे तोट्यात चालले आहेत. रेल दुनिया या वेबसाईटवर याबाबतचे माहिती सांगण्यात आली आहे. देशभरातील काही भागांमध्ये वंदे भारताला चांगला प्रतिसाद मिळतोय. तर भुवनेश्वर विशाखापट्टणम, टाटानगर- ब्रह्मपूर, रीवा- भोपाळ, कलबुर्गी- बंगळुरू,उदयपूर- आग्रा/ जयपूर, दुर्ग- विशाखापट्टणम, नागपूर- सिकंदराबाद आदि मार्गावर निम्म्यापेक्षा जास्त सीट हा रिकाम्या राहू लागल्याची माहिती आहे. या ट्रेनची सेवा ही विमानासारखी प्रीमियम सेवा आहे. अगदी पुणे मुंबई असा वंदे भारतचा प्रवास करायचा विचार केल्यास तिकीट उपलब्ध असतात. या मार्गावरील वंदे भारत ट्रेन लोकांच्या सोयीची आहे. बहुतांश वेळा प्रवाशांनी ही ट्रेन भरलेली असते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -