Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रआठ वर्षांच्या दोन चिमुरड्या मुलींवर स्कुल बस ड्रायव्हरकडून लैंगिक अत्याचार, नराधमाला पोलिसांनी...

आठ वर्षांच्या दोन चिमुरड्या मुलींवर स्कुल बस ड्रायव्हरकडून लैंगिक अत्याचार, नराधमाला पोलिसांनी घातल्या बेड्या

मागील काही दिवसांमध्ये अल्पवयीन मुली, महिला यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांमध्ये (Crime) मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. बदलापूर, अकोला, पुणे यासह राज्याच्या अनेक मोठ्या शहरांमध्ये अल्पवयीन मुलीसोबत घडलेल्या घटनांनी नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. अशातच पुण्यात दोन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार (Crime) केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, स्कुल बस ड्रायव्हरने आठ वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना पुण्यातील वानवडी भागात घडली आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 45 वर्षांच्या स्कुल बस ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे. 30 सप्टेंबरला हा स्कुल बस ड्रायवर विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत पोहचला. शाळा सुटल्यावर मुलींना पुन्हा घरी सोडताना त्याने आठ वर्षांच्या दोन पिडित मुलींना ड्रायव्हरच्या केबीनमधे बोलावले आणि त्यांच्यासोबत अश्लील चाळे केले. एका पिडीत मुलीने याबाबत पालकांना याबाबतची माहिती दिल्यावर ड्रायव्हरला अटक करण्यात आली. पिडीत मुलींची प्रकृती व्यवस्थीत आहे. नियमाप्रमाणे प्रत्येक स्कुल बसमधे एक महिला केअर सेंटर असणं बंधनकारक आहे. या स्कुल बसमधील महिला केअर टेकर यावेळी स्कुल बसमधे होती का हा प्रश्न उपस्थित होतोय. बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेनंतर पालकांमध्ये आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

 

बारामतीतील दोन अल्पवयीन मुलींवर हडपसरमध्ये लैंगिक अत्याचार

बारामतीतील दोन अल्पवयीन मुलींना पुण्यातील हडपसर परिसरातील चार जणांनी अत्याचार केला होता त्यानंतर आणखी सात जणांनी अत्याचार केल्याचा प्रकार तपासामध्ये समोर आला आहे. यामधील ज्ञानेश्वर आटोळे, अनिकेत बेंगारे यश उर्फ सोन्या आटोळे अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. बारामती तालुका ग्रामीण पोलिसांनी तपास केल्यानंतर यापूर्वी या दोन मुलींवर बारामतीतीलच सात जणांनी अत्याचार केल्याची घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी यामधील आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींचा पोलीस शोध घेत आहे. (Crime News)

 

पुण्यातील प्रोफेसरच्या मुलीवर अत्याचार

दोन दिवसांपुर्वी शहरातील एका नामांकित महाविद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर चौघांनी लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी मंगळवारी (दि. 24) कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Crime News)

 

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्क पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या एका नामांकित महाविद्यालयामध्ये पीडित तरुणी शिक्षण घेते. तर आरोपी देखील याच महाविद्यालयात 11वी,12वीचे शिक्षण घेत आहेत. त्यातील एकाने पीडितेला पार्टीसाठी म्हणून आरोपींपैकी एकाच्या फ्लॅटवर नेले. तेथे गेल्यावर आरोपींनी ड्रगचे सेवन केले आणि पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. घटनेनंतर घाबरलेल्या पीडितेने ही बाब तिच्या घरच्यांना सांगितल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. त्यानंतर पीडितेच्या पालकांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात धाव घेतली.(Crime News)

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -