Thursday, November 21, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात NIA-ATS च मोठं जॉईंट ऑपरेशन, कुठे कारवाई केली? किती जणांना उचललं

महाराष्ट्रात NIA-ATS च मोठं जॉईंट ऑपरेशन, कुठे कारवाई केली? किती जणांना उचललं

महाराष्ट्रात NIA म्हणजे राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि एटीएसने मोठी कारवाई केली आहे. NIA आणि ATS ने जॉइंट ऑपरेशन करुन छत्रपती संभाजीनगर, मालेगाव आणि जालन्यातून काही तरुणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या तरुणांचा देश-विघातक कृत्यात सहभाग असल्याचा एटीएस आणि NIA ला संशय आहे. NIA आणि ATS ने या तरुणांची चौकशी सुरु केली आहे. NIA ने कारवाई करण्याची ही पहिली वेळ नाहीय. यापूर्वी सुद्धा छत्रपती संभाजीनगर, मालेगावमधून काही तरुणांना उचललं होतं. महाराष्ट्रात तीन ठिकाणी अशा प्रकारची कारवाई झाल्याची माहिती आहे. सध्या छापेमारी झालेल्या ठिकाणी पंचनामे सुरु आहेत, असं सूत्रांकडून सांगण्यात आलं.

छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा आझाद चौक जवळील भागामध्ये ही कारवाई झाल्याची माहिती आहे. देश विरोधी कृत्यात हे तरुण सहभागी असल्याचा संशय आहे. शनिवारी पहाटेपासून एनआयए-एटीएसने ही कारवाई सुरु केलीय. जालना आणि संभाजीनगरमधून 3 जणांना ताब्यात घेतले आहे. गांधीनगर जालना येथून 1 जण, छत्रपती संभाजी नगर शहरातील आझाद चौका जवळून एक जण आणि एन सिक्स परिसरातून एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. हे तिघेही देश विघातक कृत्य करण्याच्या तयारीत होते, अशी माहिती आहे.

जम्मू-काश्मीरमधील काही संघटनांशी या कारवाईचा संबंध असल्याच बोललं जातय. या तरुणांना का उचललय? त्यांनी काय केलय? हे अजून समजलेलं नाही. यापूर्वी देखील इसिसच्या प्रभावाखाली येऊन त्यांच्या संपर्कात असलेल्या तरुणांविरोधात अशाच प्रकारची कारवाई झाली आहे. NIA आणि ATS या दोन्ही दहशतवाद रोखण्यासाठी काम करणाऱ्या संस्था आहेत. दहशतवादी संघटनांची पाळमुळं शोधून काढताना त्यांची आर्थिक रसद शोधून त्यावर घाव घालण्याचा NIA चा नेहमी प्रयत्न असतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -