अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण, अभिजीत सावंत, निकी तांबोळी, धनंजय पोवार आणि जान्हवी किल्लेकर हे बिग बॉसच्या घरात आहेत. विशेष म्हणजे या सर्वांचाच बिग बॉसच्या घरात धमाकेदार गेम नक्कीच बघायला मिळाला. वर्षा उसगांवकर या बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळाले. वर्षा उसगांवकर यांना बिग बॉसचे प्रबळ विजेतेपदाचे दावेदार म्हणून बघितले जात होते.
आता बिग बॉस मराठी सीजन 5 च्या फिनालेला अवघे दोन दिवस शिल्लक असताना बिग बॉसचा विजेता कोण होणार याबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ आहे. अनेक दावे लोकांकडून केले जात आहेत. सूरज चव्हाण हाच बिग बॉस मराठी सीजन 5 चा विजेता होणार असल्याचे सातत्याने सांगितले जातंय. विशेष म्हणजे बिग बॉसच्या घरात असलेल्या सदस्यांचा सुरूवातीपासूनचा त्यांचा प्रवास दाखवण्यात आलाय.
सूरज चव्हाण हा बिग बॉसच्या घरातील सर्वात प्रामाणिक सदस्य असल्याचा लोकांचा दावा आहे. हेच नाही तर बऱ्याच वेळा सूरजच्या राहण्यावरून त्याच्या वागण्यावरून हेच नाही तर त्याच्या खाण्यावरूनही बिग बॉसच्या घरातील काही सदस्यांनी त्याची मजाक उडवली. मात्र, सर्व गोष्टी त्याने अत्यंत संयमाने घेतल्याचे लोकांचे म्हणणे आहे. जवळपास सर्वच आठवड्यांमध्ये सूरज चव्हाण याला नॉमिनेशनमध्ये टाकले गेले.
प्रत्येक आठवड्यात नॉमिनेशनमध्ये टाकल्यानंतरही तो सुरक्षित राहिला. फिनाले विकला सुरूवात झाल्यानंतरही सूरज चव्हाण याने जेवताना अन्न डाईनिंग टेबलवर सांडल्याने अंकिता वालावलकर त्याच्यावर ओरडताना दिसली. त्यावेळी सूरज हा टेबल साफ करताना दिसला होता. यानंतर सूरज याच्यासाठी थेट निकी तांबोळी ही बोलताना दिसली.
निकी तांबोळी हिने थेट म्हटले होते की, आता किती दिवस राहिले आहेत नका ओरडू तुम्ही त्याच्यावर हवे तर मी साफ करते. त्यानंतर अंकिता हिच्यावर लोकांनी जोरदार टीका देखील केली होती. सूरज चव्हाण याला लोक मोठ्या प्रमाणात सपोर्ट करताना दिसत आहेत. सूरज चव्हाण हाच बिग बॉस मराठी सीजन 5 चा विजेता होईल असे सातत्याने सांगितले जातंय