उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ठाण्यात बोलत असताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एमएमआर रिजनमध्ये काम हाती घेतले आहेत. आशियातील सर्वात मोठ्या लाईनचं उद्घाटन आज मोदीजी करत आहेत. नवरात्र सुरु आहे. मोदीजी फक्त ९ दिवस उपवास करतात. फक्त पाणी पितात. मेट्रो ३ ला महाविकासआघाडीने स्थगिती दिली होती. हजारो कोटी रुपये खर्च करुन स्थगिती दिली. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की, ही पर्यावरणाची साथ देणारी मेट्रो आहे. पर्यावरणाचं संवर्धन करणारी मेट्रो आहे. पण उद्धव ठाकरे यांचं इगो दुखावल्याने त्यांनी स्थगिती दिली. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात नवीन सरकार येताच पहिल्या टप्प्याचं काम आम्ही पूर्ण केलं.
मोदीजींच्या मैत्रीमुळे जपानकडून मदत – फडणवीस
‘मोदीजी तुमची आणि जपानची मैत्री यामुळे जपानच्या सरकारने मदत केली. म्हणून मेट्रो तयार होत आहे. रोज १७ लाख प्रवासी यातून प्रवास करतील. लोकांच्या जीवनात सुखाचे दिन येतील. ठाण्यात अंतर्गत रिंग मेट्रोचं ही उद्घाटन आज होत आहे. यामुळे लोकांचं जीवन सुखर होणार आहे. ठाणे आणि मुंबईत आता फक्त २० मिनिटांचं अंतर असणार आहे. मुंबई पेक्षा तीन पट मोठी मुंबई होणार आहे. त्याची ही सुरुवात इथे होत आहे.’
राहुल गांधींनी आधी शिवरायांची माफी मागावी – फडणवीस
राहुल गांधी कोल्हापुरला आले होते. त्यांनी ही छत्रपती शिवरायांची आठवण आली. पण त्यांना सांगू इच्छितो की, त्यांना जर शिवरायांवर बोलायचं असेल तर जवाहरलाल नेहरु यांनी शिवरायांचं अपमान करणारं पुस्तक लिहिलं आहे. आधी शिवभक्तांची माफी मागा.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, गेल्या १० वर्षापासून ते देशाची सेवा करत आहेत. १०० दिवसात मोदींनी विकासाची सेंच्युरी मारली आहे. महायुतीचा घटक म्हणून आम्ही सहभागी आहोत याचा आनंद आहे. भारताच्या विकासाचा पाया मजबूत झाला आहे. मोदींच्या नेतृत्वात पुढील १० वर्ष हे भारताचे असेल याबाबत कोणतीही शंका नाही. राज्यात ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात दमदार कामगिरी सुरु आहे. प्रत्येक क्षेत्रात महिलांना प्राध्यान्य दिले जात आहे.